रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू
सिंधुदुर्गनगरी-:
वेंगुर्ला पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्हानू जगन्नाथ सरमळकर यांना ते नवबौद्ध असल्यामुळेच पदोन्नती नाकारली असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की नवबौद्ध अधिकारी कर्मचा-याना न्याय देताना नियम बदलतात का ? असा प्रश्न उपस्थित करत आजपासून जिल्हा परिषद समोर घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मौजे नाटळ गावचे सुपुत्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वाहन चालक पंढरी हरी पांगम, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वरिष्ठ सहाय्यक एस.जी. मांजरेकर उपस्थित आहेत.