*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कुमारी माता*
नको कुणाला तरी लाभते
दिव्यातून ती मोठ्या जाते
कलियुगातील कुंती सुद्धा
तीही एक माताच असते.
फुल नाजूक फुलता बागेत
पित्त माळ्याचे खवळते
उपेक्षित शब्द, वंचित प्रेमा
तीही एक माताच असते.
कोण चूक ? कोण बरोबर
पाप पुण्य त्यात कुणी मोजते
कठीण गणित सोडवणारी
तीही एक माताच असते.
अजाण बाला पाय घसरला
राहतो तो मात्र नामानिराळा
देवून स्वनाव बाळा वाढविते
तीही एक माताच असते.
न पाळता विवाह बंधन
संतान अनौरस नामाभिधान
जरी शहाणी वेडीच असते
तीही एक माताच असते.
विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664