*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*।।श्री शनिदेव प्रसन्न।।*
श्री शनेश्वर देवा आम्ही करितो वंदन
शरण आम्ही व्हावे सर्वांवर प्रसन्न।।ध्रु।।
सूर्य देवाचे तेज प्रचंड होईना सहन
सूर्य पत्नी संज्ञा प्रतिमा ठेवून गेली निघून
सूर्यपुत्र शनि चा वैशाख आवसेचा जन्म।।1।।
मात पिता छत्र हरपले सोडलं मातेंन
अजाण बालक खाई फळ पिंपळपान
पिंपळवृक्ष ढोली बनले आश्रयस्थान।।2।।
नारदमुनी जात होते पिंपळा जवळून
पिंपळ ढोलीत आढळले बालक अज्ञान
मुनींनी केली विचारपूस कोण अजाण।।3।।
नारदांनी बाळाचे पिप्पलात ठेवले नाम
ब्रह्मदेवाची तपश्चर्या कर गेले सांगून
ब्रह्मदेवानं दिले वर पिप्पलातला दोन।।4।।
प्रश्नोपनिषद रचना केली पिप्पलातनं
शनि वजास्त्र केले दधिची मुनींचे अस्थिनं
शनिदेव घडवती आयुष्याचे उघडे दर्शन।।4।।
पिंपळ वृक्षाला करावे सदा जलार्पण
शनी महादशेची पिडा टळे करू नमन
अहंकार टाळावा शनिदेव होई प्रसन्न।।5।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.पिन.410201.
Cell.9373811677.