पाठलाग स्वप्नांचा…
कधी दिवसा उजेडी पडलेल्या,
तर कधी,
रात्र रात्र भंडावून सोडलेल्या,
मनात कुठेतरी सलत असलेल्या,
कधी खोलवर रुतलेल्या,
जखमेवर खपली धरलेल्या,
अतृप्त इच्छा नकळत…
बंद डोळ्यांत अवतरलेल्या,
रात्र धुंदीत जागवलेल्या,,,
पाठलाग स्वप्नांचा…
कधी फुलांच्या कुशीत पहुडलेल्या,
तर कधी,
वाऱ्याच्या मस्तीत शहारलेल्या,
निळ्याशार अवकाशात उडणाऱ्या,
शांत जलाशयात विहारणाऱ्या,
जलपरी सम भासणाऱ्या,
सखेचा नाजूक हात हाती घेऊन…
एकांतात…
कुठवरी दूर दूर नेणाऱ्या,
पाठलाग स्वप्नांचा…!!!
दिपी…!!!