You are currently viewing तळवणे, मळेवाड,कोंदुरा, धाकोरा येथे बेकायदा चिरे उत्खनन

तळवणे, मळेवाड,कोंदुरा, धाकोरा येथे बेकायदा चिरे उत्खनन

मनसेतर्फे कायदेशीर मार्गाने लढाई – सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन सादर

सावंतवाडी

तळवणे मळेवाड कोडूरा धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा (चिरे)गौण उत्खनन सुरू असून एका जागेचा एटीएस रिपोर्ट दाखवून दुसर्‍याच जागेत चिरे उत्खनन करण्यात आले आहे. सदर दोन्ही जागांचे सातबारा वेगवेगळे असून एकाच्या परवान्यावर दोन तीन खाणीत उत्खनन सुरु आहे. मुळात प्रत्यक्षात असलेल्या चिरे खाणीपैकी बरेच खाणी या बेकायदेशीर आहेत. याकडे महसूल विभागाने पूर्णत कानाडोळा केला असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडला जात आहे. शिवाय उत्खननासाठी घालण्यात आलेल्या अटी शर्तीचे पालन या खाण व्यावसायिकांकडून करण्यात येत नाही. याठिकाणी वायु व ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत होत आहे. ५०० ब्रासच्या परवानगिवर १००० ब्रास उत्खनन होऊनही कोणीच याकडे लक्ष देत नाही म्हणजे आंदळ दळंतय कुत्र पिठ खातय अशीच स्थिती आहे.
तरी प्रत्यक्षात जागेवर पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी सरपंच व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पाहणी करुन सदर कामाची पंचयादी घालावी अन्यथा मनसेतर्फे कायदेशीर मार्गाने लढाई लढविण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर मनविसे शहराध्यक्ष निलेश देसाई आरोस मा विभागअध्यक्ष मंदार नाईक शुभम सावंत मंदार नाईक रोशन सावंत प्रसन्न सावंत कार्तिक माळकर विशाल गुरव सिद्धू मुलीमानि आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा