अखेरचा हा तुला दंडवत….!
प्रिय वि.मं.दाणेवाडीस….
कुठून सुरुवात करु….? समजतच नाही. आज तुही दुःखीच दिसलीस. नेहमीसारखं स्वागत नाही केलेस. चेहरा पडलेलाच होता. पटकन निघणारी कुलपं आज रुसून बसली…. कसाबसा दरवाजा उघडला आणि पंखा लावायला बटण दाबले पण तो सुद्धा आज नाराज..खिडक्या उघडताना त्याही नाराजीने कुरकुरल्या…नेहमी आरशात पाहून स्मितहास्य करणारी तिजोरी.. तिनेही नाराजीने स्वागत केलं…केरसुणी, सुपली ने बंड पुकारुन कोपरा धरला होता…त्यांना जाऊन अंजारुन गोंजारुन वर्गखोली साफ करुन घेतली…नेहमी टवटवीत, बोलका असणारा फळा आज निस्तेज आणि अबोल दिसला. खडूचा बॉक्स टेबलवर पालथा पडला होता….टेबल, खुर्ची सारेच मौनात. कुणीच आज हसून दाद दिली नाही. मग सगळ्यांनाच सांगितले , ” हो, बदली झालीय जावंच लागेल.” असं म्हणून इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका अनावर झाला. मन मोकळं केलं.
गेल्या सात वर्षातील तुझ्यासोबतचा जिव्हाळा डोळ्यासमोर तरळला. इथे नवीन रुजू झाले तेव्हा खूप रडले होते. जुन्या शाळेतील मोठा स्टाफ, मोठी इमारत, मोठा पट त्यापेक्षा इथं सगळं इवलंस. द्विशिक्षकी शाळा. कसं राहायचं इथं…? म्हणून रडायला येत होतं. पण जसा तुझा लळा लागला अन् आपला धागा जुळला…तसं खूप काही चांगलं घडत गेलं. शाळा सुटली की तुझ्याशी संवाद सुरु व्हायचा. तुला नटवण्याचा कल्पना तुलाच सांगायची. तेव्हा तू
हसायची…लाजायची…सावधही करायची. हे शक्य नाही म्हणायची…पण पाठबळही द्यायची..हळूहळू तुझं रुपडं बदलत गेलं…तुझी नव्याने ओळख निर्माण झाली…तुझ्या कुशीत आणि शिक्षकांच्या मायेत शिकणारी लेकरं गुणवंत होऊ लागलीत. पालकांचा, ग्रामस्थांचा विश्वास वाढू लागला.गावातील प्रत्येकालाच अभिमान वाटावा असं माळरानावर , टेकडीवर एक सुंदर चित्र तुझ्यारुपाने रेखाटलं गेलं…त्याकामी शेकडो हात पुढे आले. टेकडीवरचं हे नंदनवन पाहून समाधान वाटायचं.
शिस्त व निष्ठेने काम करण्याच्या तत्वाने एक चांगलं प्रशासन राबवण्याची संधी दिलीस. प्रशासनाचे विविध धडे तुझ्या जवळ बसून शिकताना नवचैतन्य लाभायचं…!
राबवलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून तुझं नाव होऊ लागलं…अगदी जिल्हास्तरापर्यंत आपण धडकून आलो..!! तुझ्यामुळे अनेक सन्मान लाभले.
पण खरं सांगू का..? कितीही वेळ झाला तरी तुझ्या सहवासात कशाची भीती वाटली नाही..शाळा भरवण्याची आपली घाई असायची पण सुटण्याची घाई कोणालाच नसे. आम्ही शिक्षक , विद्यार्थी सारेच रेंगाळत असायचो तुझ्यापाशी. वाचणारे, लिहिणारे, खेळणारे विद्यार्थी पाहून तुला सा-यांचं कौतुक वाटे.
कोणत्याही पालकांची कधीही तक्रार येऊ दिली नाहीस. शाळा दूर माळरानावर पण विद्यार्थ्यांचे छोट्या मोठ्या अपघातांचे गालबोट लावू दिले नाहीस. पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या या माळावर तू कधी पाण्याची कमतरता भासू दिली नाहीस. शाळेतील प्रत्येक वस्तूचे तू रक्षण केलेस. तू एक अद्भूत शक्ती होऊन सोबत राहिलीस. अर्थात तू सुरक्षाकवच बनूनच पहारा देत होतीस.
गेल्या सात वर्षात खूप चांगली साथसोबत केलीस…पण आज जो दिवस यायला नको होता तो अखेरीस उगवलाच..आणि तो म्हणजे कार्यमुक्तीचा. मस्टरला शेवटची सही करताना डोळे डबडबले.आज तुझा जड अंतःकरणाने निरोप घेताना खूप भरुन आलं.तुझ्या सहवासातील हा कार्यकाल अविस्मरणीय राहील. तुला अजून फुललेलं, बहरलेलं पाहायचं आहे..ही इच्छा पूर्ण होऊ दे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.
©®सौ.विद्या नलवडे , कोल्हापूर .
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*