You are currently viewing ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन

३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन

अमरावती

स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी व मिशन आयएएस फाउंडेशनच्या वतीने येत्या ६ जून रोजी असणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेचा विषय छत्रपती श्री शिवाजी महाराज जीवन व कार्य असा आहे. या निबंध स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले निबंध लिहून किंवा टंकलिखित करून प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस जिजाऊ नगर महापौरांच्या बंगल्यासमोर विद्यापीठ रोड अमरावती कॅम्प 444602 या पत्त्यावर पाठवावे. बाहेरगावचे विद्यार्थी हा निबंध 9890967003 व्हाट्सअप वर किंवा iasmission@gmail.कॉम या ईमेल आयडीवर पाठवू शकतात .या निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्पर्धा परीक्षांची पुस्तके देण्यात येणार असून पहिल्या दहा क्रमांकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. या निबंध स्पर्धेसाठी मराठी हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये आलेले निबंध स्वीकारण्यात येतील. निबंध स्पर्धेत आपला निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२३ ही असून या तारखेपर्यंत आलेल्या सर्व निबंध स्पर्धकांना ६ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात व डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरात गौरविण्यात येणार आहे. तरी या निबंध स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
============= प्रकाशनार्थ प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प

प्रतिक्रिया व्यक्त करा