सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी ओरोस यांना निवेदन सादर
ओरोस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे लोकार्पण ९ ऑक्टोबर २०२१ ला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व केंद्रीय नागरी हवाई मंत्री ना, ज्योतीरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते, त्यानंतर वर्षभराने डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळाला स्वातंत्र्य सेनानी आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून नावलौकिक मिळवलेले दिवंगत बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता,
सिंधुदुर्ग चिपी विमानतळास थोर स्वातंत्र्य सेनानी बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष के मंजूलक्ष्मी यांना निवेदन सादर देण्यात आले.
बॅरिस्टर नाथ यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसद पटू म्हणून आपला ठसा देश पातळीवर उमटविला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देऊन आपल्या भूमिपुत्राच्या स्मृती जतन करणे सिंधुदुर्ग जिल्हावाशियाना शक्य होईल. याबाबतचा ठराव महाराष्ट्र शासनाने केला असून 01 फेब्रुवारी 2023 रोजी तो केंद्र सरकारकडे देखील पाठविला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व संसदरत्न प्राप्त मा, सुप्रियाताई सुळे या याबाबत सातत्याने पाठपुरावा केंद्रीय नागरी हवाई मंत्री ना, ज्योतीरादित्य शिंदे यांच्या कडे करत आहेतच आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना याबाबत तातडीने निर्णय घेऊन सिंधुदुर्ग चिपी विमानतळास बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा आपण तातडीने करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष- अमित सामंत यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष अनंत पिळणकर, सरचिटणीस भास्कर परब, संघटक सचिव- काका कुडाळकर,
जिल्हा बँक संचालक- आत्माराम ओटवणेकर, डॉ. लिंगावत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष- पुडलिक दळवी, वैभववाडी तालुका अध्यक्ष- रवींद्र चव्हाण
कणकवली विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांनी सादर केले.