You are currently viewing गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या विविध मार्गदर्शन वर्गांचा समारोप

गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या विविध मार्गदर्शन वर्गांचा समारोप

सावंतवाडी:

आजगाव येथील ‘पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित केलेला सहावी ते आठवीतील मुलांसाठीचा ‘मूलभूत गणित मार्गदर्शन वर्ग’ आजगाव मराठी शाळेत नुकताच पार पडला. दि. ८ मे ते १३ मे या कालावधीत मुलांना गणितातील मूलभूत नियम समजावून सांगण्यात आले. या वर्गासाठी अमित नातू या आयआयटीमधून बी.टेक. केलेल्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. अमित सर हे प्रतिष्ठानचे सदस्य असून त्यानी मनोरंजक पद्धतीने मुलाना गणित विषय समजावून दिला. या वर्गाचा एकूण १६ मुलांनी लाभ घेतला. नातू कुटुंबीय आणि दिलीप पांढरे कुटुंबीयांकडून मुलांना अल्पोपहार देण्यात आला. खुशी परब, गंधार गवंडे आणि भूमी हळदणकर या विद्यार्थ्यांच्या हस्ते सरांना सन्मानित करण्यात आले.

रविवार दि. १४ मे रोजी मुलाना इंग्लिश स्पीकिंग संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. श्रृती संकोळी या पुण्याच्या शिक्षिकेमार्फत हा वर्ग घेण्यात आला. वर्गाचा २१ मुलांनी लाभ घेतला. शुभम् सावळ या मुलाने त्यांना सन्मानित केले.

समन्वयक विनय सौदागर यांनी प्रतिष्ठानच्या विनामूल्य शैक्षणिक कार्याची माहिती सांगून पुढील वर्षीच्या मार्गदर्शन वर्गाचे नियोजन सांगितले. या वर्गाचा किंजल मयेकर ,साक्षी सुतार , मानसी पांचाळ, सानिया शेख, संचित पांढरे, वैभव पांढरे, तनवी पांढरे, प्रभाकर मोरजकर, आयान शेख ,विष्णू कळसुलकर,दिया सावंत, कौस्तुभ मुळीक, श्रीनाथ परब, आर्यन पांचाळ, चिन्मय मराठे, आसिफ आवटी आणि रेहान आवटी या विद्यार्थ्यानी लाभ घेतला. वर्गाला दत्तगुरू कांबळी सरांचे सहाय्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा