ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख
लोकसभेत गदारोळ नेहमी होतो, पण असा कधी झाला नाही. अडाणी वरुन प्रचंड संघर्ष निर्माण झाला आहे. त्यात राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले. सर्व पक्ष टोकाची भूमिका घेत आहेत. विरोधी पक्ष या दोन्ही घटनांमुळे आज एकत्र झाला. एकत्र येण्यास काहीच मुद्दा मिळत नव्हता, पण राहुल गांधीच्या अपात्रेतेमुळे सर्व विरोधी पक्ष एक झाले आहेत. या दृष्याचे मुख्य कारण एक अशी व्यक्ती आहे जी जगातील जवळजवळ सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली होती ती म्हणजे अडाणी.
हिंडनबर्ग रिसर्च ही एक कंपनी आहे. जगातील सर्व घडामोडीवर संशोधन करते आणि अहवाल जाहीर करते. अशाचप्रकारे त्यांनी अडाणीच्या कंपनीवर संशोधन केले व अहवाल सादर केला. हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर अडाणी ग्रुपला आपले लक्ष आणि स्ट्रॅटेजी मध्ये अमुलाग्र बदल करावा लागला. अडाणी ग्रुपने शेअर मार्केटमध्ये प्रचंड उलाढाल केली. अनेक बँकांकडून कर्ज घेऊन तो सट्टा खेळला आणि अनेक नवनवीन उद्योग कब्जा करू लागला. या पैशावर अडाणी ग्रुपने शेअर विकत घेऊन अनेक कंपन्या गिळंकृत केल्या. आता देखील मोठ्या प्रमाणात आपल्या ग्रुपची संख्या वाढवणार होता, पण हिंडनबर्ग रिसर्च या कंपनीने अडाणीच्या ग्रुपचा एक लेखाजोखा पब्लिक समोर ठेवला. त्याबरोबर अडाणीचे सगळे शेअर कोसळायला लागले. ह्या दरम्यान अडाणीने नवीन शेअर सुद्धा मार्केटमध्ये आणले होते. तिची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. अडाणी ग्रुप आणखी अनेक शेअर्स मध्ये घुसणार होता.
मात्र आता या योजनेतून माघार घेतली आहे. याशिवाय निधी देण्याच्या धोरणातही बदल करण्यात आला आहे. हिंडनबर्ग संशोधन अहवालात अडाणी समूहाच्या कंपन्यांवर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोप करण्यात आला होता. अडाणी ग्रुपने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते, पण शेअर्स या धक्क्यापासून वाचू शकले नाहीत. अशा परिस्थितीत अडाणी ग्रुपला आपल्या रणनीतीवर पुनर्विचार करावा लागला, कारण गुंतवणूकदार आपल्या आरोग्याबाबत घाबरले.
अडाणी समूहाचे मालक गौतम अडाणी यांची काही क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना होती, परंतु ब्लूमबर्गला सूत्रांकडून समजले आहे की आता ही योजना बदलली आहे. सूत्रांनुसार, समूह आता पेट्रोकेमिकल्स विभागात प्रवेश करण्यापासून मागे हटत आहे आणि मुदंडा येथे ग्रीनफिल्ड कोळसा-ते-पॉलीविनाइल क्लोराईड प्रकल्प हे ४००दशलक्ष करोडचे प्रकल्प देखील पुढे जाण्याची शक्यता नाही. याशिवाय, कंपनी अॅल्युमिनियम, स्टील आणि रस्ते प्रकल्पांमध्ये ही पुढे जाण्यापासून रोखत आहे.
अडाणी आता मुख्य प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत आता वीज निर्मिती, बंदरे आणि हरित ऊर्जा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या प्रमुख क्षेत्रांमध्येही रणनीती बदलली आहे. काही महिन्यांपूर्वी अडाणी समूहाने NDTV विकत घेतला होता आणि त्यावेळी समूहाने म्हटले होते की, देशाचा स्वतःचा फायनान्शियल टाईम्स किंवा अलजजीरा बनवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. तथापि, आता सूत्रांचे म्हणणे आहे की अडाणी ग्रुप मीडिया विभागात यापुढे कोणतीही खरेदी करणार नाही.
अडाणी कुटुंबाने २०१५ करोड डॉलरचे कर्ज फेडण्यासाठी शेअर्स विकले आणि आता उच्च-जोखीम असलेल्या वित्तपुरवठापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. अडाणी समूहाचे बहुतेक शेअर्स हे अडाणी कुटुंबाच्या नावावर आहेत. अडाणी आता समभाग तारण ठेवण्याऐवजी खाजगी बाँड प्लेसमेंट आणि दिग्गज गुंतवणूकदारांना व हिस्सेदारांना विकून पैसे उभारण्याची योजना आखत आहे. हिंडनबर्ग संशोधन अहवालात अडाणी समूहाच्या कंपन्यांवर स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग मध्ये फसवणूकीचा आरोप आहे.
अडाणी देशाच्या मालवाहू व्हॉल्यूम पैकी सुमारे एक तृतीयांश माल वाहतूक हाताळते आणि इस्त्राईल ते श्रीलंकेपर्यंत त्यांचे संचालन आहे. तथापि, या व्यवसायात देखील कंपनीने खर्च निम्म्याने कमी करण्याची योजना तयार केली आहे आणि ती वेळेपूर्वी $ ६०८ दशलक्ष (रु. ५००० कोटी) कर्जाची परतफेड करेल.
याशिवाय खर्च कमी करण्यासाठी अडाणी समूहाला काही सौद्यांमधून माघार घ्यावी लागली, तर सहयोगी कंपन्यांनी काही सौद्यांना स्थगिती दिली. फ्रान्सच्या Total EnergiesSE ने अडाणी समूहासोबत ग्रीन हायड्रोजन भागीदारी प्रकल्प थांबवला आहे, तर फेब्रुवारीमध्ये अडाणीने देशातील कोळसा खाण खरेदी करण्याची योजना रद्द केली आहे. याशिवाय, समूहाने इलेक्ट्रिसिटी ट्रेडर पीटीसी इंडियासाठी ही बोली लावली नाही. गुंतवणूकदारांचा विश्वास पुर्न संचयित करण्यासाठी अडाणी समूहाचे अधिकारी जगभरात रोड शो करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा प्रभाव लवकरच EBITDA वर दिसून येईल आणि तो सध्याच्या ३.१ वरून २.५ पर्यंत खाली येऊ शकतो.
ब्रोकरेज फर्म अरिहंत कॅपिटल मार्केट्सचे संशोधन प्रमुख अभिषेक जैन यांच्या मते, पुर्नवित्त खर्च झपाट्याने वाढत आहेत, सेंटिमेंट देखील अडाणी विरोधात आहे, परंतु त्यानुसार जोखीम देखील जास्त आहे. अभिषेकच्या मते गुंतवणूकदारांचा विश्वास परत करण्यासाठी ते सर्व काही करत आहेत. अशा स्थितीत दलालांनी समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची सूचना केली आहे.
अडाणीच्या पैशाची उलाढाल राजकीय पाठिंब्या शिवाय करता आली नसती. त्याची प्रगती अगदी आश्चर्यकारक आणि झपाट्याने झाली. २०१४ च्या आधी अडाणी हा अंबानी बरोबर काम करत होता व खुल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात जास्त फायदा त्यांनी घेतला. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करून शेअर मार्केटच्या आधारे आपली मालमत्ता वाढवत गेला. ती इतकी की जगातील पहिल्या पाच श्रीमंतांमध्ये अडाणी गणला जाऊ लागला. त्यातच हिंडनबर्गचा रिपोर्ट जाहीर झाला. या काळात अडाणी अगदी वेगाने नवीन नवीन कंपनी विकत घेत होता. विकत घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी असते.
कुठली कंपनी आपल्याला पाहिजे असेल तर मार्केटमध्ये असलेले तिचे शेअर विकत घ्यायचे. हे शेअर विकत घेण्यासाठी पैसा पाहिजे. तो मिळवण्यासाठी बँकेला आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे. अर्थात राजकीय पाठिंबा असल्याशिवाय बँका मोठी रक्कम कुठल्याही कंपनीला देत नाही. साधे शेतीचे कर्ज घेण्यासाठी कोणी गेला तरी त्याला कर्ज देताना बँका कर्ज घेण्यापासून हैराण करून सोडतात. बँकेचा पैसा म्हणजे लोकांचा पैसा घ्यायचा आणि कंपनी विकत घ्यायची. अशा प्रकारे बेकायदेशीर काम करून काळा पैसा निर्माण करून आपल्या विकत घेण्याचा धंदा हा खतरनाक असतो. आर्थिक उदारमतवादी राजकारण या देशात १९९१ ला सुरू झालं. त्यावेळी हर्षद मेहता सारखा मोठा दलाल उभा झाला. त्यांनी इकडून तिकडून पैसा ओढून शेअर मार्केटमध्ये गुंतवला आणि प्रचंड संपत्ती निर्माण केली. शेअर विकत घेतल्यानंतर काही काळामध्ये त्याचे पैसे द्यायचे असतात. बऱ्याचदा काय होते हे शेअर माणूस विकत घेतो, पण त्याचे पैसे देत नाही आणि असे पैसे न देता विकत घेतले असे दुसऱ्याला विकतो. त्यातून फायदा काढतो आणि पुन्हा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतो. काही मेहनत न करता अशा प्रकारे लाखो करोडो रुपयाचे मालक हे दलाल होतात. ही प्रक्रिया उघडकीस आली म्हणून सरकारने हर्षद मेहता यांना कैद केले आणि अनेक वर्ष तो तुरुंगात होता व तुरुंगातच मेला. पुढे अशा गोष्टी होऊ नये म्हणून CBI सारखी यंत्रणा निर्माण करण्यात आली. जेणेकरून या शेअर धंद्यावर नजर सरकारची असावी, पण आता ती सुद्धा फेल झाली आहे असे दिसत आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९