– भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत
कणकवली
शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या भिरवंडे गावातील कार्यकर्त्यांनी आज चक्क मुख्यमंत्री महोदयांचा फोटो लावून उपोषण सुरू केले. आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला.
आता सत्ताधारीच सत्तेतील लोकांचे फोटो लावून उपोषणाला बसले तर सर्वसामान्य जनता शिवसेनेकडून काय अपेक्षा करणार? 2 दिवसांपूर्वी पालकमंत्री व खासदार विनायक राऊत यांनी या उपोषण संदर्भात पाहणी केली होती, असे असताना शिवसेनेचे पदाधिकारी आज उपोषणाला बसलेत, ते देखील राज्याच्या मुख्यमंत्री, मंत्री, खासदार यांचे बॅनर लावून. याचा अर्थ सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार ,सतीश सावंत याच्या वर विश्वास नाही असा होतो. तसेच हे उपोषण सतीश सावंत समर्थक (शिवसेना ) चे होते का अशी चर्चा काही कडून होत आहे. कारण उपोषण च्या बॅनर मधून जिल्हा प्रमुख व आमदार वैभव नाईक यांना या बॅनर मधून डावलण्यात आल्याने नाराजी असल्याचे जाणवत असल्याचे भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांनी निदर्शनास आणून दिले आहे.