ओरोस
ओरोस चे माजी सरपंच व श्री देव रवळनाथ देवस्थानचे प्रमुख मानकरी चंद्रकांत परब यांचे शनिवारी पहाटे जिल्हा रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते 68 वर्षाचे होते. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष व वारकरी संप्रदायाचे प्रमुख, भाजप बूथ कमिटीचे अध्यक्ष आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले या पंचक्रोशीतील लोकनेते म्हणून त्यांची फार मोठी ओळख होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजतात पोरस पंचक्रोशीत शोककळा पसरली. ओरोस ग्रामपंचायत कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते परेश परब यांचे ते वडील होत.
ओरोस गावच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. वारकरी संप्रदायाची स्थापना व दरवर्षी पंढरपूर वारीचे नियोजन ते करीत असत. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. पोरस ग्रामपंचायत सरपंच म्हणून त्यांनी केलेली विकास कामे व ओरोस वाशियांची असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध फार मोठे होते.
मधुमेह आजारामुळे काही वर्ष ते त्रस्त होते. गुरुवारी मध्यरात्री त्यांना त्रास जाणू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी पहाटे त्यांचे प्रांजल मालवली. त्यांच्यावर ओरोस येतील स्मशानभूमीत शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर तसेच ओरोस वासीय उपस्थित होते, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे.