You are currently viewing 12 ते 14 मे रोजी कुडाळात ‘कोकण समर फेस्टिवल’

12 ते 14 मे रोजी कुडाळात ‘कोकण समर फेस्टिवल’

 

कुडाळ :

छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोकण समर फेस्टिवल’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ते 14 मे 2023 या कालावधीत नगरपंचायत पटांगण, बाजारपेठ कुडाळ येथे संध्याकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होत आहे. लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना तसेच युवा कलाकारांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती संयोजक मोनाली वर्दम, गौरी धडाम, हर्षदा पडते, अपर्णा शिरसाठ यांनी दिली.

प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. जिल्ह्यातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, दागिने, कपडे, कोकणी मेवा, घरगुती पदार्थ अशा विविध प्रकारच्या वस्तू, सेवा यांचे स्टॉल्स येथे असतील. युवा कलाकारांना संधी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवा मध्ये होणार आहे.

यावर्षी प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण इंस्टास्टर कोकणहार्टेड गर्ल अंकिता प्रमोद प्रभुवालावलकर यांची पहिल्या दिवशी उपस्थिती असेल. तसेच खास गोव्यातील प्रसिद्ध सिंगिंग शो आयोजित केला आहे. दुसऱ्या दिवशी आपल्या कुडाळातील प्रसिध्द ठाकरवाडी येथील पारंपरिक कठपुतली चा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच बालगोपालांचा दशावतार देखील असेल. 14 मे ला मोरया कला ग्रूप प्रस्तुत जल्लोष कलागुणांचा यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे.

त्यामुळे या महोत्सवात लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी मनोरंजन, खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.

सर्वांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन कोकणची चेडवा यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा