You are currently viewing ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उद्योजक व उमेदवारांनी सहभाग घ्यावा

ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उद्योजक व उमेदवारांनी सहभाग घ्यावा

ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उद्योजक व उमेदवारांनी सहभाग घ्यावा

 – प्र.सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे

सिंधुदुर्गनगरी 

खाजगी क्षेत्रातील कारखाने उद्योगव्यापारउद्योजकदुकानेशॉप्स व इतर व्यवसाय यांना सद्यस्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे, ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळावा दिनांक 17 मे 2023 रोजी आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी दिली आहे.  

            उद्योजकांना आवश्यक असलेल्या रिक्तपदांची माहिती त्यांच्या लॉगीनने ऑनलाईन पोस्ट करण्याची सुविधा कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर उपलब्ध आहे. ज्या उद्योग आस्थापनांनी या पोर्टलवर नोंदणी केलेली नाही. परंतु त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे, अशा उद्योजकांनी प्रथम वरील पोर्टलव्दारे आपली नोंदणी करून रिक्तपदे पोस्ट करावीत.

            जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील उद्योजकांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. नोकरी साधक (Job Secker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अॅप्लाई करावे. ऑनलाईन ॲप्लाई केलेल्या उमेदवारांना उद्योजक मुलाखतीसाठी ऑनलाईन तारीख व वेळ देवून मुलाखत ऑनलाईन घेवून अंतिम निवड करतील किंवा त्यांच्या अटीशर्तीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवून अंतिम निवड करु शकतील.

            जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक तसेच उमेदवारांनी ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी ०२३६२-२२८८३५ ई-मेल  आयडी –sindhudurgrojgar@gmail.com संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा