मालवण
बजेट योजने अंतर्गत मंजूर केलेल्या ओझर रेवंडी भद्रकाली मंदिर ते कोळंब रस्त्याचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, सरपंच अमोल वस्त उपस्थित होते. या रस्त्याच्या कामासाठी बरीच वर्ष ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली होती. यासाठी आमदार वैभव नाईक यांनी बजेट योजने अंतर्गत सुमारे १० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी रेवंडी ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. आमदार नाईक यांनी यापुढील जी विकास कामे असतील तीसुद्धा पूर्ण करू अशी ग्वाही दिली.
यावेळी उपसरपंच श्रद्धा वेंगुर्लेकर, शाखाप्रमुख संजय कांबळी, उपशाखाप्रमुख सुरेश गावडे, माजी सरपंच युवराज कांबळी, संतोष कांबळी, प्राजक्ता कांबळी, विजय कांबळी, भावेश कांबळी, सुधीर कांबळी, संजय निवतकर, दिलीप मोर्वेकर, संतोष मुणगेकर, महेश कांबळी, प्रथमेश कांबळी, रवींद्र कांबळी, विनोद कांबळी, अनिरुद्ध कांबळी, सुधीर मोर्वेकर, संदीप धुळे, गिरीश कांबळी उपस्थित होते.