You are currently viewing तीन महिन्यानंतर कार्य. अभियंता सर्वगोड टीमसह फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाच्या कामावर

तीन महिन्यानंतर कार्य. अभियंता सर्वगोड टीमसह फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाच्या कामावर

फोंडाघाट

काल अचानक ढगाळलेल्या वातावरणात, कार्यकारी अभियंता सर्वगोड, उपकार्यकारी अभियंता प्रभू, पवार इत्यादी टीम,, बाजारपेठेत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामावर सुमारे तीन महिन्यानंतर पाहणीसाठी आणि रस्ता मोजणीसाठी चक्क उपस्थित झाले.अचानक मोजमापामुळे बाजारातील घरमालक- व्यावसायिक संतप्त झाले. आजवर आपण अथवा आपल्या कार्यालयाचे अभियंता, इंजिनियर कामावर का उपस्थित नाही? चालू कामामुळे आमच्या गावात आमच्या– आमच्या मध्ये वाद- भांडणे का लावता ? असा जाब विचारला. मात्र यावर कार्यकारी अभियंता सर्वगोड निरुत्तर झाले.

रस्ता रुंदीकरण पाच मीटरने करण्यास सुरुवातीपासूनच सर्व घरमालक- व्यापारी यांनी स्वखुशीने सहमती दर्शवली होती. मात्र पाच मीटरचे सहा मीटर रुंदीकरण करताना, टेंडर प्रमाणे नुकसान भरपाईची आग्रही मागणी ठेकेदार, बांधकाम विभाग यांनी फेटाळून लावली.यावेळी ज्यांची घरे- इमारती नसलेलेच मोठ्या मोठ्या तावातवाने बोलत होते. आणि सहविचार सभा सात मिनिटात आवरून कोणालाही बोलण्यास न देता आणि सत्कार सोहळा आवरून १ कोटी ७७ लाखाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले.यावेळी नागरिकांनी आपल्या भिंती- शटर्स- घरे धडाधड पाडून सहकार्य केले. त्यामुळे सुमारे पाच हजारापासून लाखापर्यंतचा भुर्दंड प्रत्येकाला सोसावा लागला. कुणाच्याही देखरेखी अभावी नियोजन शून्य, निकृष्ट काम गटार बांधकाम सह पाच- सहा- सात मीटरने रस्ता रुंदीकरणचे-गटार खोदण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ- व्यापारी- घरमालक यांच्यामध्ये एकंदरीत पक्षीय राजकारणाचा वास येत असल्याचे बोलले जात आहे.

आपल्या माणसांचे रुंदीकरण चार ते पाच मीटरने आणि न बोलणाऱ्या,गोरगरिबांचे सहा ते सात मीटरने ! यादरम्यान गटारासह अन्यत्र बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळे एकंदरीत रस्ता रुंदीकरणाच्या निकृष्टते बाबत प्रश्न उभा झाल्याचे उपस्थितानी सर्वगोड आणि प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिले. नियम जर सर्वांना सारखे असतील आणि झालेल्या कामाचे बिल झाले असेल तर कामामध्ये तफावत आणि अनियमितता का ? याचे उत्तर अधिकारी वर्ग देऊ शकले नाहीत.

यावेळी सचिन तायशेटे, विनय मोदी, साहिल बांदिवडेकर, संदीप पारकर, अनिल बांदिवडेकर, अनिल पटेल, वैभव चिके, प्रसाद हळदिवे,केदार रेवडेकर आणि लगतचे इमारत मालक आणि व्यावसायिक उपस्थित होते.त्यामुळे यापुढे कार्यकारी अभियंता फोंडाघाटचे “ऐतिहासिक रस्तारुंदीकरण” बाबत कोणते पाऊल उचलतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे…..

प्रतिक्रिया व्यक्त करा