You are currently viewing तिवरे शाळेचा अभिनव उपक्रम

तिवरे शाळेचा अभिनव उपक्रम

कवी अजय कांडर यांच्या हस्ते विद्यार्थी साहित्य विशेषांकाचे प्रकाशन

कणकवली

बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे लेखन गुणवत्ता असते परंतु त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे गुरुजनही लाभावे लागतात.तिवरे प्राथमिक शाळेतील साहित्य लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षक लाभल्यामुळेच त्यांची बालवयात साहित्यिक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर प्राथमिक शाळांना हा एक आदर्शच आहे असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी तिवरे येथे केले.

तिवरे प्राथमिक शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांचा ‘ज्ञानवेध’हा साहित्य विशेषांक कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या प्रकाशन सोहळ्याला शांताराम सावंत (केंद्रप्रमुख),रामदास आंबेलकर(शाळा स.अध्यक्ष), दीक्षा कदम, निशा चव्हाण (ग्रामपंचायत सदस्य), विजय परब, संतोष वाळवे,सौ.दीपिका सुतार,सौ.मीरा आंबेलकर,सौ.नमिषा म्हाडेश्वर,सौ.राजश्री गुरव,सौ.पूजा वाळवे,सौ.मैथिली वाळवे.सौ.जाधव, मुख्याध्यापक विजय शिरसाट, शिक्षक संदीप कदम,विजय मेस्त्री, हेमंत राणे.
अंगणवाडी सेविका-सौ.करुणा आंबेलकर आदी उपस्थित होते.

केंद्र प्रमुख सावंत म्हणाले,मागील नऊ वर्ष तिवरे प्राथमिक शाळा विद्यार्थी साहित्य विशेषांक प्रसिद्ध करत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या साहित्य लेखनाला प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्रातील विविध बाल साहित्य उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित झाला असून त्याला मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.असा विशेषांक सातत्याने प्रसिद्ध करण्याचे हेच महत्त्वाचे मोल आहे. याच कार्यक्रमात शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरणही कवी अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात आले. यात पुढील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. आदर्श विद्यार्थी-श्रवण वाळवे,आदर्श विद्यार्थीनी-समीक्षा गोसावी- शिष्य.परीक्षा उत्तीर्ण गौरव -समीक्षा विजय गोसावी, वैष्णवी गोपाळकृष्ण सुतार, समीक्षा संतोष चव्हाण,श्रवण प्रसाद वाळवे,रोशन संतोष वाळवे.अनुश्का महेश वाळवे,सावली सुहास वाळवे,मयुरेश राजाराम गुरव-क्रिडा सन्मान -चैताली आंबेलकर, वक्तृत्व सन्मान-समीक्षा चव्हाण.निबंध स्पर्धा सन्मान-वैष्णवी सुतार,काव्य स्पर्धा सन्मान-रिया परब.

प्रतिक्रिया व्यक्त करा