You are currently viewing उभादांडा – भेंडमाळा मधील ब्राह्मण मंदिरा शेजारील बंधाऱ्याचे लघुपाटबंधारे विभागाकडून सव्ह्रेक्षण

उभादांडा – भेंडमाळा मधील ब्राह्मण मंदिरा शेजारील बंधाऱ्याचे लघुपाटबंधारे विभागाकडून सव्ह्रेक्षण

वेंगुर्ले

कित्येक वर्षाची मागणी असलेला उभादांडा – भेंडमाळा येथील ब्राह्मण मंदिरा शेजारील बंधाऱ्याचे सव्ह्रेक्षण लघुपाटबंधारे विभागाकडून करण्यात आले . सदर बंधारा मंजूर व्हावा म्हणून गेली चार – पाच वर्षे ह्या कामाचा पाठपुरावा करण्यात येत होता . स्थानिक ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पडवळ यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन कागदपत्राची पुर्तता केली व सदर काम जिल्हापरिषद कडुन मंजुर होण्याकरीता भाजपा पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला . या पाठपुराव्याला आता यश आले असून लघुपाटबंधारे विभागाची सर्व्हेक्षण टीम येऊन सदर बंधाऱ्याचे सर्व्हेक्षण केले .त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे . यापुर्वी सदर बंधारा तात्पुरत्या स्वरुपात लोकसहभागातून ग्रामस्थ तयार करत असत , परंतु आता कायमस्वरुपी काँक्रिटचा बंधारा मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व्हेक्षणाच्या वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , परबवाडा उपसरपंच पपु परब , माजी ग्रा. पं.सदस्य शिवाजी पडवळ , प्रताप तांडेल , उमेश कांबळी , मनोहर कांबळी , सौरभ कांबळी , न्हानु कांबळी , महादेव तांडेल , उल्हास तांडेल इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा