You are currently viewing कणकवली वनविभाग कार्यालयातील कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात…

कणकवली वनविभाग कार्यालयातील कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात…

कणकवली

कणकवली वनविभागातील वनमजुर नारायण शिर्के याने लाकूड वाहतुकी संदर्भातील कामाकरिता तब्बल ४० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कणकवली जानवली येथील वनविभागातील कर्मचाऱ्याला लाच मागताना रंगेहाथ पकडले. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जानवली वनपरिक्षेत्र कणकवली या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईनंतर वनविभागामध्ये एकच खळबळ उडाली असून, यापूर्वी कणकवली वन विभागामधील अनेक कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले होते. व त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती . आता पुन्हा या विभागात लाचखोरी बळावल्याने अखेर कणकवलीतील एका तक्रारदाराने या विभागातील या लाचखोर कर्मचाऱ्याचा परदाफाश केला. या तक्रारदाराने यापूर्वी देखील एका मोठ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडून दिले होते. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, पोलीस कर्मचारी पप्या रेवणकर, निलेश परब, रविकांत पालकर, जितेंद्र पेडणेकर, हवालदार अजित खंडे, प्रथमेश पोतनीस, कांचन प्रभू आदींच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईने सिंधुदुर्ग वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा