You are currently viewing शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री देव भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कलशारोहण सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ..

शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री देव भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कलशारोहण सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ..

वरवडे (कणकवली) / उदय गोसावी :

 

शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वरवडे गावातील प्रसिद्ध असलेल्या श्री देव भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण सोहळ्यास शुक्रवारी भक्तीमय वातावरण शुभारंभ झाला. या सोहळ्यात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.

वरवडे येथील श्री देव भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण सोहळा शुक्रवारी ११ मे पासून मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. १५ मे पर्यंत धार्मिक आणि विविध भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजता श्री देव परदेशी गांगेश्र्वर या ठिकाणी श्री गणेश पूजन व पुण्याहवाचन, देवास महाअभिषेक, ग्रहयज्ञ, होम, आरती अशा धार्मिक विधींचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दुपारी ३ ते १० या वेळेत परदेशी गांगेश्वर या ठिकाणाहून कलश मिरवणूक पारंपारिक पद्धतीत पार पडणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा