दोडामार्ग :
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेऊन आमच्यासारखे अनेक विद्यार्थी घडले. आपला तसेच गावाचं नावलौकीक वाढवलं. परंतु आज इंग्रजी माध्यमाच्या फॅडामुळे जिल्हा परिषद शाळांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक शिक्षक यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी तळकट दोडामार्ग येथे केले.
दोडामार्ग तालुक्यातील तळकट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एकचा शतक महोत्सव सांगता समारोप रविवारी झाला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, संपर्कप्रमुख शैलेश परब, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणे, जिल्हा परिषद माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुकाप्रमुख संजय गवस भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी माजी. प .सदस्य संपदा देसाई सरपंच सुरेंद्र सावंत माजी सरपंच रामचंद्र सावंत शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष दुर्गाराम गवस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास देसाई, नारायण देसाई, दीपक देसाई बाबाजी झेंडे ,मुख्याध्यापक अरुण पवार गटविकास अधिकारी व्ही.एम.नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्य संपदा देसाई, बाबा देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच अन्य मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकून अनेक विद्यार्थी घडले. मोठ्या पदापर्यंत गेले. मात्र आज इंग्रजी माध्यमाच्या फॅडमुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या अस्तित्वापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु जिल्हा परिषद असो की अन्य मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत. त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी भूमिका घेतली पाहिजे. शाळा वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 165 वर्षे झालेल्या दोन शाळा आहेत. दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या दहा शाळा आहेत. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या पन्नास शाळा आहेत. त्यामध्ये तळकट शाळा आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. पूर्वजांनी आपल्या शिक्षणाची सोय कठीण परिस्थितीत केली. त्याची जाण आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे जिल्हा परिषद शाळेसाठी सर्वतोपरी मदत माझ्याकडून होईल अशी ग्वाही खासदार राऊत यांनी दिली.
आपण कितीही मोठे झालोतरी आपल्या गावाला विसरता कामा नये. सण, समारंभाला गावी येऊन ग्रामस्थ, शेजारी यांच्याशी संवाद साधला पाहिजे बाबुराव धुरी यांनी ब्रिटिश कालखंडात या शाळा सुरू झाल्या आहेत. आपल्या पूर्वजांनी आपल्या शिक्षणाची सोय गावात केली. त्यातूनच आपण घडलो याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. शिक्षण हे व्यक्तीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते. दुर्गाराम गवस यांनी शतक महोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. आजी माजी विद्यार्थी, शिक्षक यांचे सत्कार करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत बाबाजी झेंडे, रामदास देसाई, सरपंच सुरेंद्र सावंत यांनी केले. यावेळी शरद धुरी, विजय देसाई, संतोष देसाई, विष्णू देसाई, दीपक मळीक तसेच ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.