*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*स्री जन्मा ही तुझी कहाणी*
*हृदयी अमृत नयनी पाणी…*
कदाचित ब्रह्मदेवाने सर्व नद्या व सर्व सागर स्रियांच्या नयनातच
साठवले असावेत असे वाटण्या इतपत अश्रू स्रियांच्या डोळ्यातून वहात असतात. जन्मल्या पासूनच त्या मोत्यांची
गळती सुरू होते. जन्मता टॅ हॅ फुटतो नि कमी अधिक फरकाने
आयुष्यभर तो पुरतो.अगदी अपवादानेच एखादी महिला असेल की जी कमी रडली असेल. रडली नाही अशी महिला तर सापडणारच नाही इतक्या खात्रीने मी सांगते जणू विधात्याने
महिला व अश्रूंना बांधूनच पाठवले असावे.
जन्मल्या पासूनच जणू तिचे अश्रूंशी नाते असते. मुलगी जन्मताच तोंडे वेडीवाकडी होतात.आनंद ? छे! जन्मत:च ती जणू पालकांसाठी प्रश्न घेऊन येते. स्री आणि पुरूष एका
संसार रथाची दोन चाके म्हणतात नि मग ती जन्मताच इतके
दु:ख? तिच्या शिवाय जन्मच नाही, साखळी नाही, सृजन नाही
तरी किंमत नाही.घरोघर किती दु:ख भोगतात महिला याला
सुमार नाही. कारणे वेगवेगळी असतात पण टारगेट स्रीच असते. जणू प्रत्येक गोष्टीला तीच जबाबदार असते. काही ही
झाले तरी तूच जबाबदार! बाकी सारे साळसूद! माहेरचे म्हणतात, आता काही होवो, माहेरी यायचे नाही. असह्य झाल्यावर एखादी मग विहिरीचा आश्रय घेते.
आई होतांना प्रचंड वेदनेतून तिला आईपण मिळते. पण त्याची
ही फारशी कदर होतेच असे नाही. घरात मर मर मरा. आता तर
आमच्या पिढीने व नविन पिढी पण बाहेर काम करून घर सांभाळतात.पण तू दमलीस का ग ..? एवढे शब्द ही तिच्या
वाट्याला येत नाहीत.असेल कदाचित एखादी बिचारी जिच्या
वाट्याला हे शब्द आले असतील. हुंडा छळ, माहेरून वसुली,
बलात्कार विनयभंग काय आणि किती सोसावे महिलांनी!
बरे, पुरूष तर पुरूष मुर्ख महिलाही तिच्या शत्रू असतात. ह्या
अडाणचोट स्रिया कुठल्यातरी खुळचट कल्पनांना बळी पडलेल्या असतात व ते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात.
हे दुष्टचक्र कधी संपेल हे मला माहित नाही.पण आहे हे बिलकुल खोटे नाही. शहरातून आज परिस्थिती बदललेली
आहे हे खरे आहे पण खरे सांगा स्री अजून खऱ्या अर्थाने स्वतंत्र
आहे? याचे उत्तर नाही हे आहे, हे आपल्या अंतर्मनाला माहित
आहे. कोणी कबूल करो वा न करो.खेड्यातून त्याच खुळचट कल्पनांना स्रिया अजून चिकटून आहेत. असो, ही कहाणी संपण्या
सारखी नाही जो वर पुरूषांना ती संपाविशी वाटत नाही तोवर
ती संपणार नाही हे कुणी ही मान्य करेल.आमचे दुर्दैव दुसरे काय?
नयनी पाणी हृदयी अमृत
कदर कुणी ना केली
ढोर मेहनत कणव तिची हो
सारी वाया गेली….
विष झाले का अमृत सारे
दिवसा दिसती तारे
कधी पालटतील माहित नाही
येतील सुखमय वारे…
झाड सुखाचे आहे माऊली
उपभोगा सावली
त्यास विचारा अभाग्यास हो
ज्यास नाही माऊली ..
ही दर्दभरी कहाणी संपावी अशी मनिषा बाळगून थांबते.
॥धन्यवाद॥
आणि हो, ही फक्त माझी मते आहेत …🙏🏼🙏🏼
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १ मे २०२३
वेळ : दुपारी २:३५
_______________________________
*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*
*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*
*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*
*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*
*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*
*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*
*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*
*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*
*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*
👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*
*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*
*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________