कुडाळ :
पावशी ग्रामपंचायत नजीक सर्विस रस्ता व जुन्या ठिकाणी बस थांबा शेड होण्यासाठी ग्रामस्थांनी जन आंदोलन केले. वारंवार सांगून सुद्धा प्रशासन टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली.
पावशी येथील बावस्करवाडी, खोतवाडी, भटवाडी, मेस्त्रीवाडी भोगटेवाडी येथील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. कामानिमित्त जण्याकरिता थेट महामार्गावरून जावे लागते. मुलांना शाळा कॉलेजला जाण्याकरिता बस थांबा करिता महामार्गावर पावसात उभे राहावे लागते. त्यामुळे महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे कधीही अपघात होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. या परिस्थितीमुळे ग्रामस्थ सध्या जीव मुठीत घेऊन महामार्गावर येजा करीत आहेत.
याबाबत सदर बाब तात्काळ उपाय योजना करण्याबाबत महामार्गाच्या कार्यालयास तत्सम प्रशासनास भेट देऊन याची कल्पना दिली असून वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही यावरून संबंधित प्रशासन आम्हा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आहे.
आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, सरपंच वैशाली पावसकर, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद खोत, शेखर पोखरे, दीपक पावसकर, शंकर पावसकर, अरुण धुरी, पंकज खोत, शेखर महेश मेस्त्री, दिव्या खोत, सूरज पावसकर, नागेश खोत, प्रकाश पावसकर, रुपेश खोत, सुयोग मेस्त्री आणि सर्व पावशी ग्रामस्थ उपस्थित होते.