कणकवली
कणकवली तालुक्यातील ओटव गावात पावणादेवी मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू होते. देवीची प्रतिष्ठापना व होम पूजा सुरू असताना तेथे झालेल्या आगीच्या धुराने मंदिरा नजीक असलेल्या एका झाडावरील मधमाशांनी मंदिरातील भक्तांवर हल्ला केला. यात साधारपणे २५० हुन अधिक लोक उपस्थित होते. त्यातील काहीजण जीवाच्या आकांताने घरी पळाले तर काही वयोवृद्ध व्यक्तींचा मधमाशांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील ओटव गावात घडली. साधारणपणे यात ५० लोकांना मधमाशा चावल्या असल्याची माहिती समजत आहे.
मधमाशा चावलेल्या नागरिकांना तातडीने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आजूबाजूच्या परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले. यामध्ये कोणाला गंभीर दुखापत झालेला नाही. मात्र कडाक्याच्या उन्हाळ्यात सुदैवानं मोठी हानी झालेली नाही.