मसुरे :
मसुरे येथील साईकृपा मित्र मंडळ गड घेरा बाजारपेठ यांच्या वतीने आयोजित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये ईशा गोडकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेमध्ये एकूण 35 स्पर्धक सहभागी झाले होते. रेकॉर्डन्स स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांक पूर्वा मेस्त्री, तृतीय क्रमांक आरोह आहीर, चतुर्थ क्रमांक समर्थ गवंडी यांनी पटकाविला. तर पाच ते दहा क्रमांक अनुक्रमे रमाकांत जाधव, हर्षदा गावकर, दिशा नाईक, मृणाल सावंत, विवेक सावंत, दिया लुडबे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण श्री आनंद तांबे, श्री किशोर कदम आणि प्रसिद्ध नृत्य कोरिओग्राफर प्रियांका करंबळेकर यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक राजेश कदम यांनी केले. सर्व परीक्षक आणि सूत्रसंचालक राजेश कदम यांचा साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने रूदय सत्कार करण्यात आला.
यावेळी सहभागी सर्व स्पर्धकांना साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने प्रशस्तीपत्रक आणि पेडणेकर परिवाराच्या वतीने रोख रकमेचे बक्षिसे देण्यात आली विजेत्या एक ते दहा क्रमांकाच्या स्पर्धकांना साईकृपा मित्र मंडळ मसुरे गडगेरा बाजारपेठ यांच्यावतीने रोख रकमेची बक्षिसे देण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री संग्राम प्रभूगावकर श्री शिरीष प्रभूगावकर, समीर प्रभुगावकर, सुनील प्रभू गावकर प्रदीप पाटकर, शैलेश मसुरकर, यशवंत परब, रोशन दुखंडे, रुपेश दुखंडे, बाळू दळवी, अवधूत चव्हाण, दीपक पेडणेकर, समीर सावंत, निळकंठ शिरसाठ, केदार धुरी, दीपक शिंदे, बापू खोत, अवधूत चव्हाण, दिनकर दूखंडे, मनीष घाडीगावकर, समर्थ दुखंडे,वानिष शिरसाट,महेश दुखंडे, बाळा मेस्त्री, ओमकार दुखंडे, चेतन दुखंडे, समर्थ दुखंडे, आयुश दुखंडे, नयन मसुरकर,प्रशांत मसुरकर,साई बागवे,परेश पाटकर,बंड्या शिंदे, संदेश सागवेकर,यश शिरसाट, दिपेश मांजरेकर,उन्मेष तुळसकर,जयेश इंदप, स्वप्नील दुखंडे,झुंजार पेडणेकर, बाबू मुळीक,रामचंद्र मसुरकर,चंद्रसेन बागवे,मया बागवे, भाई वायगनकर आणि साईकृपा मित्र मंडळ मसुरे बाजारपेठ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.