ओरोस
लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो पलटी होऊन देवगड पाडगाव येथील जखमी झालेल्या रुग्णांची आमदार नितेश राणे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन विचारपूस केली. या सर्व रुग्णांना योग्य ती रुग्ण सेवा मिळावी अशा सूचना त्यानी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात दाखल झाल्या झाल्या त्यानी गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयास भेट दिली वा जखमी झालेल्या रुग्णांना धीर दिला. अपघातानंतर तातडीने दूरध्वनी द्वारे त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांना सर्व रुग्णांची योग्य काळजी घ्यावी व चांगल्यात चांगली वैद्यकीय सेवा पुरवावी अशा सूचना दिल्या होत्या.
सिंधुनगरी येथील जिल्हा रुग्णालय या अपघातातील 9 रुग्ण दाखल आहे, एका गंभीर जखमी रुग्णाला गोव्याला हलविण्यात आले आहे तर अन्य किरकोळ जखमीवर कणकवली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव, पाडगाव चे सरपंच नितेश गुरव विभागीय अध्यक्ष कृष्णा गुरव, फणसगाव सरपंच उदय पाटील, बंड्या नारकर, भाजपचे कार्यकर्ते श्री संतोष वालावलकर आधी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरू आहे. प्रत्येक जखमी ची भेट घेत आमदार नितेश राणे यांनी त्यांना धीर दिला.