*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*संत साहित्याचा समाजावर प्रभाव*
मुकुंदराजांचा “विवेकसिंधू” , हरिहरनाथांचे शिष्य रघुनाथ यांनी मुकुंदराज यांची निवड करून त्यास “मराठी समाजास
दिशा देणारा ग्रंथ हवा”या अपेक्षेने ग्रंथ साकार करण्यास
सांगितले, ते ही शा.श.१११० साली, व त्यांनी रघुनाथांच्या
समाधीस्थळी बसून ग्रंथ लिहिला अंभोरा या गावी व तो इतक्या जुन्या काळी.ओवी छंदात एकूण १८ अध्यायात या ग्रंथात शंकराचार्यांच्या वेदांतावर निरपणात्मक विवेचन केले आहे. म्हणजे बघा इतक्या जुन्या काळात ग्रंथ निर्मिती झाली
ती सुद्धा समाज कल्याण हा हेतू डोळ्यांसमोर ठेऊनच ..!
आपल्या लक्षात आलेच असेल संत साहित्याचे उद्दिष्ट !
“समाजास दिशा देणे” केवढा उदात्त हेतू होता हो! म्हणजे
अगदी सुरूवाती पासूनच संतांनी समाजकल्याण हेच ध्येय
डोळ्यांसमोर ठेवले होते.मग अशा संत साहित्याचा
समाजावर परिणाम झाल्याशिवाय कसा राहिल ?अगदी
गौतम बुद्धापासून ते महावीर जैन यांच्या पर्यंत तर तुकोबा
एकनाथ रामदास ज्ञानेश्वरांपर्यंत आपण संत साहित्याचा
आढावा घेतला असता..”निव्वळ समाज मार्गदर्शन व
लोकहितोपदेश हेच संत साहित्याचे उद्दिष्ट आहे हे आपल्याला
स्पष्ट दिसते आहे.
त्या सर्व संत महात्म्यांनी लोककल्याणासाठीच आपली लेखणी व वाणी वापरली. संत ज्ञानेश्वर म्हणतात..
“येणे विश्वात्मके देवे..पसायदान हे” कृपाप्रसाद हवा पण
कुणासाठी? विश्वाच्या कल्याणासाठी. सर्व संतांचे साहित्य
अभंग आहे अक्षर आहे, कालप्रवाहातही ते कधी ही नष्ट
होणार नाही कारण समाजाच्या नसानसात ते मुरले आहे,
अन्नासारखे रक्तप्रवाहात भिनले आहे इतका त्याचा प्रभाव
जबरदस्त आहे. आता हे सारे संत साहित्य नसानसात मुरले
पचले याचा अर्थ काय होतो? समाजाचा तो आदर्श आहे.
याचाच परिपाक म्हणजे, ज्ञानेश्वर ते गोरोबा काका चोखा मेळा सावता माळी नरहरी सोनार जनाबाई नामदेव इ. संत
चातुर्वर्ण्य व्यवस्था इतकी मजबूत असतांनाही ही सर्व मंडळी
पंढरीच्या वाळवंटात एक होऊन नाचतात, व एक नवा आदर्श
घालून देतात, माणूस म्हणजे एकच त्याची जात म्हणजे
माणुसकी!
सर्व संतांचे आचरण इतके उदात्त होते की, ते असतांनाच
समाजाने त्यांना डोक्यावर घेतले भले त्यांना अग्नीपरिक्षा द्यावी
लागली पण लेकांनी त्यांना ओळखले व काही अंशी का होईना
समाज त्यांचे आचरण करू पाहतो आहे, त्यांच्या आदर्शांवर
चालत आहे. तुकोबाचे अभंग मुखोद्गत आहेत, एकनाथी भागवत व ज्ञानेश्वरीची पारायणे होतात. दासबोध घरोघर
वाचला जातो हे कसले लक्षण आहे? निवृत्तीनाथ यात्रा भरते,
हजारोंनी आषाढी कार्तिकीला वारकरी पंढरीला जातात,निवृत्ती
ज्ञान सोपान मुक्ताई यांचा जयजयकार होतो ते उगीच नाही.
छोटी मुक्ताई चांगदेवा सारख्या हटयोग्याची गुरू होते, हे सारे
अद् भूत होते.आणि हे सारे साहित्य हातात उपलब्ध आहे.
समाजाला मार्ग दाखवते आहे व दाखवत रहाणार आहे.
“गीता”हा ग्रंथ तर विश्व मान्य आहे. त्याचे तत्वज्ञान आम्ही
अंगिकारण्याचा प्रयत्न करतो भले यश येवो न येवो.तोच
आमचा आदर्श आहे व राहिल यात शंका नाही.गीतेत जे नाही
ते कुठेच नाही असा गीते विषयी लोकांचा अनुभव आहे. आणि
ज्यात सर्वकाही आहे ते आमच्या कृष्ण परमात्म्याने जगाला
सांगितले आहे. खरे म्हणजे गीता, त्यातून अर्जुनाला केलेला
उपदेश व कर्म सिद्धांत आम्ही अंगिकारला तर फारसे प्रश्नच
शिल्लक राहणार नाहीत. अहो, सर्व दु:खाचे मूळ अपेक्षा आहे.
तिचा त्याग केला तर जीवन सुखी होते.फलाची अपेक्षा न करता तुमची सर्व कर्मे मला अर्पण करा व निश्चिंत रहा.
किती सोपे पण आपल्याला किती कठिण जाते ते? असो.
संत साहित्याचा जनमानसावर जबरदस्त पगडा आहे ही किती
चांगली गोष्ट आहे. अहो, या सर्व संतांनीच आम्हाला एकत्र
बांधून ठेवले आहे अन्यथा दिशाहीन पांखरा सारखी आमची
अवस्था झाली असती हे नक्की!
या संत महात्म्यांन् विषयी लिहावे तेवढे थोडेच आहे. संत कबीर
संत तुलसीदास संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज किती नावे
घ्यावीत, यांच्या कार्याला तोंड नाही हो! सामाजिक रूढी व
घातक परंपरांवर या निसर्गात शिकलेल्या माणसांनी घणाघाती प्रहार केले व आपल्यावर अनंत उपकार करून ठेवले.तरी अजून त्यांच्या खाणाखुणा आमच्या नजरेसमोर आहेत. त्यांची चरित्रे स्फुर्तीगाथा आहेत व कायम आम्हाला
मार्ग दाखवत राहतील.
॥धन्यवाद मंडळी॥
आणि हो, नेहमी प्रमाणे ही फक्त माझी मते आहेत.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ३/५/२०२३
वेळ : संध्या: ५/३१
*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*
*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*
*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*
*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*
*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*
*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*
*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*
*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*
*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*
👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*
*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*
*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________