You are currently viewing सावंतवाडी ते कोलगांव,कुणकेरी,आंबेगाव जोडणारे पुल व रस्त्याचे काम मंजूर

सावंतवाडी ते कोलगांव,कुणकेरी,आंबेगाव जोडणारे पुल व रस्त्याचे काम मंजूर

जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्याहस्ते झाले आज भूमिपूजन..

सावंतवाडी

कोलगांव ग्रामपंचायत भागातील सावंतवाडी ते कोलगांव,कुणकेरी, आंबेगाव जोडणारे पुल व रस्ता करण्याचे हे काम बरीच वर्षे रखडलेल्या अवस्थेत होते.त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात तासंतास पुलावर पाणी आल्यामुळे उभ राहावं लागत होत.शाळकरी मुलांचे पण खूप हाल होत होते.यामुळे सिंधुदुर्ग जि.म.सह.बँकचे संचालक महेश सारंग यांनी विशेष प्रयत्न करुन ह्या विकासकामासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निधी साठी मागणी केली व पाठपुरावा केला.पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून १,८९,५९,७९७ रू.एवढ्या रक्कमेचे काम मंजुर झाले आहे.त्या कामाचे भूमिपूजन आज जिल्हाबँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोलगांव सरपंच संतोष राऊळ,उपसरपंच दिनेश सारंग,ग्रा.प.सदस्य संदीप हळदणकर ,रोहित नाईक,सौ.प्रणाली टिळवे,सौ.रसिका करमळकर तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर नाईक,कोलगांव सोसायटी चेअरमन विरेंद्र धुरी ,दिलिप भालेकर ,माजी नगरसेविका दिपाली भालेकर,बलवंत कुडतरकर,दिपक डामरेकर,सलमा बेगम,सलाम शेख,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच कुणकेरी सौ .सोनिया सावंत सरपंच ,सुनिल परब उपसरपंच ,माजी सभापती प्रमोद सावंत ,आंबेगाव सरपंच शिवाजी उर्फ संजू परब,उपसरपंच रमेश गावडे, ग्रा. पं सदस्य योगेश गवळी,साक्षी राऊळ संतोष राणे,ज्ञनेश्वर परब , यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा