कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात झाला ध्वजारोहण समारंभ
कणकवली
प्रगतशील महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे आणि जे या विकासाला अडथळा आणतील त्यांच्याशी संघर्ष सुद्धा करण्याची तयारी सर्वांनी दाखवायला हवी . असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे केले . महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने कणकवली येथे उभारण्यात आलेल्या ७५ फूटी उंच ध्वज स्तंभावर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . त्यावेळी ते बोलत होते . विधानभवनाचे चित्र असलेल्या आणि गर्जा महाराष्ट्र माझा हे लेखणीबद्ध केलेला विशाल असा फलक आणि या पार्श्वभूमीवर ७५ फुटी ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील स्थापनादिन असल्याने सिंधुदुर्ग वासियांना देखील आमदार नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या .या ध्वजारोहण समारंभात कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश काटकर , तहसीलदार आर.जे.पवार , इतर शासकीय अधिकारी कर्मचारी , पोलीस पथक , कणकवली कॉलेजचे एनसीसी चे पथक , इतर विद्यार्थी , शिक्षकवृंद तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .