You are currently viewing जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विजयकुमार राऊत यांच्या हस्ते भारतीय किसान संघाच्या देशी बियाणे बँकचे उद्घाटन

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विजयकुमार राऊत यांच्या हस्ते भारतीय किसान संघाच्या देशी बियाणे बँकचे उद्घाटन

“भविष्यामध्ये ज्याच्याकडे बीज असेल तोच जगावर राज्य करेल”

श्री मदन देशपांडे, महाराष्ट्र प्रांत महामंत्री, भारतीय किसान संघ

सावंतवाडी

“मानवाच्या हस्तक्षेपाने तयार झालेल्या संकरित बियाण्यांचे आयुष्य अल्पावधी असते तर निसर्गाने तयार केलेल्या जाती हजारो वर्ष टिकतात तसेच त्यांचे पोषणमूल्य उच्च प्रतीचे असते. म्हणून पारंपारिक बियाण्यांचे जतन करणे व ते वाढवणे अत्यावश्यक आहे.यासाठी भारतीय किसान संघाच्या माध्यमातून दुर्मिळ अशा देशी बियाण्यांची बँक सुरू करण्यात आलेली आहे.”असे विचार श्री.मदनजी देशपांडे यांनी भारतीय किसान संघ,सिंधुदुर्ग च्या वतीने श्री सूर्यकांत कुंभार नेरूळ देऊळवाडा येथे सुरू करण्यात आलेल्या देशी बियाणे बँक च्या उद्घाटन प्रसंगी मांडले.
बीज बँक उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व नांगर,माती, जल व बीज पूजन करून करण्यात आली. *यावेळी भात, कडधान्य, भाज्या, फळे यांची ८०पेक्षा अधिक बियाणे व पारंपरिक ३१अवजारे प्रदर्शित करण्यात आली होती.*
या कार्यक्रमाला माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग श्री. विजयकुमार राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी बीज बँक उपक्रमाला शुभेच्छा देताना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमात पारंपरिक बियाणे संवर्धन करणाऱ्या श्री लक्ष्मण राणे-मळगाव, श्री शिवप्रसाद देसाई-बांदा व आनंद रावले-कट्टा यांचा सत्कार करण्यात आला.

श्री तानाजी सावंत, जिल्हाध्यक्ष,भा. कि. संघ यांनी किसान संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर जिल्हा बीज आयाम प्रमुख श्री.सूर्यकांत कुंभार यांनी मानवी आरोग्यासाठी विषमुक्त शेती, देशी बियाण्यांचा वापर व भूमी सुपोषण ची आवश्यकता मांडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धनंजय गावडे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्या शेतकऱ्यांना देशी बियाण्या साठी काम करायचे आहे त्यांनी श्री सुर्यकांत कुंभार ७८८७६४२९७५किंवा श्री जयवंत परब ९४०४७६५६४६ यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा