सावंतवाडी / सातार्डा :
सातोसे – रेखवाडी येथील श्री वंसदेव मंदिर जिर्णोद्धार कलशारोहण व श्री वंसदेव मूर्ती पुनःप्रतिष्ठापना महासोहळा दि १ ते ४ मे रोजी या कालावधीमध्ये साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्री वंसदेव मंदिरामध्ये करण्यात आले आहे. सोमवार दि १ मे रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधी व दुपारी महाप्रसाद होणार आहे. रात्री ९ वाजता डिचोली – गोवा येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामचंद्र उर्फ किरण गोविंद तूळपुळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
मंगळवार दि २ मे रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधी व दुपारी महाप्रसाद होणार आहे. रात्री ९ वाजता हरकुळ – बुद्रुक येथील लोकप्रिय बुवा श्री अभिषेक शिरसाट व ऐरोली – नवी मुंबई येथील लोकप्रिय बुवा श्री समीर गावडे यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.
बुधवार दि ३ मे रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधी होणार आहेत. त्यानंतर १० वाजता शिखर कलश स्थापना व मूर्ती पुनःप्रतिष्ठापना होणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद देण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव कला व क्रीडा मंडळ निर्मित जगदीश दळवी लिखित व साबा च्यारी दिग्दर्शीत ‘लावणी भुलाली अभंगाला’ हा तीन अंकी संगीत नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
गुरुवार दि ४ मे रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री वंसदेव ब्राम्हण देवस्थान समिती व समस्त पंडित परिवार यांच्याकडून करण्यात आले आहे.