वैभववाडी :
वैभववाडी तालुक्यातील हेत या गावी विश्वशांती तरुण विकास मंडळ गावठणवाडी होळीचा मांड येथे श्री सत्यनारायण महापूजा निमित्त खुल्या नृत्य वैयक्तिक स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन दिनांक १३ मे २०२३ रोजी रात्री १०:३० वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील विजेत्यांना प्रथम पारितोषिक रू. १,५५५, द्वितीय पारितोषिक रू. १,१११, तृतीय पारितोषिक रू.५,५५ तसेच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पाच या स्वरूपात बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेच्या काही नियम व अटी पुढीलप्रमाणे मांडण्यात आले आहे. नृत्य स्पर्धेचा प्रवेश विनामूल्य आहे. ही स्पर्धा खुल्या गटाची असून कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. तसेच स्पर्धकाला आवडीच्या गाण्यावर नृत्य करता येईल पण निवडलेले गाणे दुसऱ्या स्पर्धकाने घेतले नसेल याची नाव नोंदणी करताना खात्री करून घ्यावी. प्रथम नोंदणी करणाऱ्या २० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल. स्पर्धकांनी निवडलेले गाणे संबंधित उपकरण नृत्याच्या पूर्वी परिपूर्ण करून आणणे. स्पर्धेच्या वेळी किमान अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे. स्पर्धा संबंधी कोणतीही बदल करण्याचा अंतिम निर्णय मंडळाचा राहील. स्पर्धकांनी या सर्व अटींची नोंद घ्यावी.
स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख ही गुरुवार दि.११ मे २०२३ ठेवण्यात आली आहे. स्पर्धकांना नावे देण्यासाठी व अधिक माहितीसाठी म्हणून तुकाराम फोडके ९७६९६९४२२२, प्रवीण फोडके ८१०८५८६९६६, दिलीप फोडके ८८०५१८५६४९, भानुदास बुरान ९८५०३२२०५८ यांच्याशी संपर्क साधावा.