शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे सोमवार, दि. 1 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 1 मे 2023 रोजी दुपारी 1.00 वा. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथून मोटारीने बांदा, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सायं. 5.00 वा. बांदा येथे आगमन व शाळा पूर्व तयारी अभियान (School Readiness Campaign) राज्यस्तरीय मेळावा उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बांदा नं. 1 ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग). सायं. 5.50 वा. बांदा येथून मोटारीने मोरंगाव ता. दोडामार्ग येथे प्रयाण. सायं. 6.00 वा. श्री. देव म्हातारबाबा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- मोरगांव ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग). सायं. 6.10 वा. मोरगांव ता. दोडामार्ग येथून मोटारीने नेमळे ता. सावंतवाडी कडे प्रयाण. सायं. 6.35 वा. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, नेमळे नं. 1 शतकमहोत्सवी सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ. जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नेमळे नं. 1 ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग). सायं. 7.00 वा. नेमळे, ता. सावंतवाडी येथून मोटारीने तळवडे गेट, ता. सावंतवाडी कडे प्रयाण. सांय. 7.15 वा. तळवडे पर्यटन महोत्सव 2023 कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- श्री. सिंध्देश्वर मंदिर नजिक, तळवडे गेट ता. सावंतवाडी). सांय. 7.30 वा. तळवडे गेट, ता. सावंतवाडी येथून मोटारीने मौजे मठ, ता. वेंगुर्ला कडे प्रयाण. सायं. 7.50. वा. श्री. देव स्वयंभू व श्री. देवी सातेरी पुन:प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- मौजे मठ ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग). सांय. 8.20 वा. मौजेमठ, ता. वेंगुर्ला येथून मोटारीने आजगांव ता. सावंतवाडी कडे प्रयाण. रात्रौ 8.45 वा. राधाकृष्ण चषक- 2023 सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा या कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- श्री. वेतोबा मंदिर सभागृह, आजगाव, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग). सोईनुसार गोवा येथून मुंबई कडे प्रयाण.