आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरे -मर्डे गावात ३२ लाखांच्या विकास कामांची भूमिपूजने*
*ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार*
माजी जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मसुरे-मर्डे ग्रा.प.वर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर विकास कामांचा धुमधडाका सुरू आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरे -मर्डे ग्रामपंचायत हद्दीतील मसुरे-चांदेर ब्राम्हणदेव मंदिर रस्त्यासाठी निधी ५ लाख, मर्डे कावातर ते हुऱ्हास रस्त्यासाठी निधी ७ लाख, मर्डे गिरकरवाडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी निधी १० लाख, मसुरे, मसदे,विरण, रस्त्यावर उनताटवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी ५ लाख, मर्डे खाजणवाडी ते सावरजुवा रस्त्यासाठी निधी ५ लाख हि कामे मंजूर केली असून शुक्रवारी या कामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गावातील लोकप्रतिनिधी व जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
गेली काही वर्षे हि कामे प्रलंबित आहेत. आ. वैभव नाईक यांनी प्रलंबित विकास कामे मंजूर करण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पुरा करत विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केला आहे.त्याबद्ल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.
यावेळी सरपंच संदीप हडकर, उपसरपंच पिंटू गावकर,राजा कोरगावकर, जगदीश चव्हाण, रामराज सावंत,राघवेंद्र मुळीक, पंढरीनाथ मसुरकर, जीवन मुणगेकर, साबाजी हडकर, दीपक कातणकर,अरुण गिरकर, समीर वस्त, विष्णू गिरकर, आशिष खोत, संजय पेडणेकर, मनीषा वस्त, सान्वी हडकर, यशस्वी कातणकर, जान्हवी गिरकर, नरेन हिनळेकर, तुळशीदास पेडणेकर, कृष्णा पाटील, समीर पेडणेकर, अशोक भोगले, तात्या मुळीक राजा मुळीक आदींसह मर्डे व चांदेर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.