*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्री अरुण वी. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-२४ वे*
—————————————–
आपल्या श्रीगुरूंच्या सेवा कार्यात तत्पर असती
तुकामाई श्रीमहाराजांची सारखी परीक्षा घेती
तुकामाई सांगे ती मेहनत महाराज करिती
गुरुकृपा विनासायास होत ना, याची ही प्रचिती ।।
शेतात जाता जड मोळी उसाची ती उचलली
तुकामाईची आज्ञा क्षणी डोहात बुडी मारली
तुकामाईंनी दिला आवाज ,बाळा, ये बाहेर रे
येता वरती महाराज, गुरूंनी प्रेमे मिठी मारली ।।
सेवावृत्ती श्रीमहाराजांची पाहून गुरू संतोषती
खात्री पटता श्रीगुरूंची शिष्याला पास करिती
आता पावेतो नऊ महिने अवधी गेला होऊनी
गुरू सेवेत श्रीमहाराज मग्न भान हरपोनी ।।
उजाडला रामनवमी” दिन, पावन पर्व आले
वदले गुरू – बाळा,वसिष्ठानी जे रामास दिले,
तेच मी तुजला दिले,हात डोईवरती गुरूंचा
त्या क्षणी “श्रीमहाराज नाम ” ब्रह्मचैतन्य जाहले ।।
गुरू-शिष्यांचा मनोसंवाद ही अनुभूती असे
म्हणे कवी अरुणदास, हे सारेच अद्भुत असे ।।
——- ——————————–
कवी-अरूणदास -अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
——————————————