मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती; उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…
सिंधुदुर्गनगरी
देवगड आणि वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्षमी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाततून जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ही आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आली आहे. याचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या दवाखान्यामध्ये बाह्य सेवा मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेली कन्सल्टेशन सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.