सिंधुदुर्गनगरी
महिला तलाठयास तसेच न्यायालयाच्या बेलिफास धमकावल्या प्रकरणी नंदकिशोर भिवा सुतार याला जिल्हा न्यायालय सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यातील संशयिताने नागवे गावाच्या तत्कालीन तलाठी शालिनी नारायण येडगे (रा. कणकवली) यांना जमिनीचे सातबारा देण्यावरून मानेवर कोयता ठेवून ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच दुसऱ्या एका प्रकरणात कणकवली न्यायालयाचे बेलिफ दिलीप सुनील ठाकूर हे वाॅरंट बजावण्यासाठी गेले असेल त्यांना जीवे ठार मारण्याचा धमकी दिली होती. या प्रकरणी आज जिल्हा न्यायालय त्याला शिक्षा सुनावली आहे.