You are currently viewing नवीन कुर्ली ग्रा पं लवकरच होणार

नवीन कुर्ली ग्रा पं लवकरच होणार

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांना दिले पत्र

पिळणकर यांचे महाराष्ट्र दिनी चे उपोषण स्थगित

कणकवली

नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत चा फेरप्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांकडून ग्रामविकास विभागला 9 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आला आहे. देवघर धरणग्रस्त असलेल्या नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत लवकरच मंजूर होईल असे लेखी आश्वासन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर याना दिले. त्यांनतर ओरोस येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे यांच्या दालनात प्रत्यक्ष पिळणकर यांनी डेप्युटी सीईओ तनपुरे यांच्याशी केलेल्या सविस्तर चर्चेनंतर महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारे आपले उपोषण स्थगित करत असल्याचे सांगितले. तब्बल 32 वर्षे होऊनही अद्याप नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्यामुळे पुनर्वसन क्षेत्रातील धरणग्रस्त ग्रामस्थांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागते.अनेकदा नागरी सुविधा आणि विकासकामे करताना अडचणी येतात.यासाठी नवीन कुर्ली वसाहतसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत द्यावी या मागणीसाठी अनंत पिळणकर हे शासनदरबारी मागील 14 वर्षे पाठपुरावा करत आहेत. मात्र शासनाकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळत नाही. त्यामुळे पिळणकर यांनी येत्या 1 मे रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. अनंत पिळणकर यांच्या नियोजित उपोषणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी तनपुरे यांनी 9 फेब्रुवारी रोजी स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून लवकरच मंजुरी मिळून नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत मिळेल असे लेखी आश्वासन अनंत पिळणकर याना दिले.त्यानंतर पिळणकर यांनी 1 मे रोजीची आपले उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा