*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम ललित लेख*
*वसंतोत्सव*
थंडीने शिशीरही गारठला…गारठला आसमंत सारा.. निष्पर्ण झाले तरूवर.. पाचोळ्याचा सडा धरेवर… ..मलुलता चराचरी. निष्क्रियता पोहचली टीपेवरी….
नी छानशी..शीतल. . झुळुक आली वा-याची…दूत वसंत राजाची… बा..आदब…बा मुलाहिजा…ऋतुराज वसंत पधार रहे है….. .. संजीवन उबदार सोनकिरणांनी…निच्चेष्ट धरेस आलिंगले….नी फुंकले हो प्राण… धरा झाली सचेतन…नाचू लागले तनमन…दंवबिंदुंनी घातले सचैल स्नान.. धरेने प्राशिले नवसंजीवन.. नवस्वप्नांची..नव आशांची.. नव प्रारब्ध लेवून… कोमल सोनकिरणांची..नवी पहाट उगवते…वसंत ऋतूचे दमदार पाऊल पडते.
वृक्षराजीला येतो बहर.. ..कोवळी पोपटी तुकतुकीत पालवी दृगोचर….. त्या वरी दंवबिंदुंची शिंपण… हिरव्या पाचूची भासे पखरण.. आम्रवृक्ष मोहरतो……मंद सुगंध बिखरतो….पिवळसर..मोहोर चकाकू लागतो…. कोकीळ पक्षी नव तराणे गाऊ लागतो.
केशरी लाल पळस फुलारतो.. चैतन्य ओसांडू लागतो.. पिवळा बहावा बहरतो..धरेस पीत हलदी वस्त्र अर्पितो… नवयौवना धरा.. हळदुली वसुंधरा …सजते नववधूसम…. लज्जीत.. अवगुंठीत… पितांबरी लेवूनी… हिरव्या पाचूच्या अलंकारांनी नटते.
पलाशच्या अग्निशिखांचे रानीवनी पेटती लामणदिवे.. नीलवर्णी आकाशी विहरती पक्ष्यांचे थवे.. . पीत बहाव्याचे तोरण ऋतुराजाच्या स्वागतासाठी झुलू लागते .. गुलमोहरही स्वागतासाठी अंगोपांगी बहरतो… पळसही ,केशरी रंगाचे गालीचे अंथरून प्रतीक्षा करतो.चैत्र बनी वा-याची शीळ घुमू लागते.
मोग-याचा मंद दरवळ.. वातावरणी सुगंधी परिमळ …पानापानातून हंसतो . मोगरा..स्वागतासाठी सज्ज बावरा.. नी ख-या अर्थाने वसंतोत्सव सुरू होतो.
वासंतीक वारे वाहू लागतात. चैतन्याचा बहर येतो. नवसृजनाची नांदी होते.सृष्टी लावण्याने नटू लागते. सजते.. रमणीय… प्रफुल्लित..नजारा सर्व दूर दिसू लागतो.
उदासिनता…नैराश्य…याचा मागमूसही दिसत नाही. निसर्ग नियमच आहे हा… पानगळी नंतर नवसृजन होणारच असते. निराशेची जागा -आशा, उमेद घेणारच असते. सृष्टीचे हे चक्र निरंतर चालूच रहाणार असते.
वसंत ऋतु हाच तर संदेश घेऊन येत असतो. माणसाच्या मनातही आशा…नवी उमेद ..नवी स्वप्न… नवप्रीत फुलवतो. प्रेमी जनांसाठी तर वसंतोत्सव म्हणजेच मीलनोत्सवच! या हृदयातून त्या हृदयी प्रीत झंकारते . तरूणाई मधुस्वप्नात रमते. रोमरोमी प्रीत फुलते. . प्रणयांत बेधुंदते..
अशातच होळीचा सण येतो. सृष्टीप्रमाणे माणूसही रंगात.. प्रेमरंगात..भक्तीरंगात.. कुविचार सोडून सुविचाराच्या पवित्र रंगात… सात्विकतेच्या पावन रंगात रंगतो.हंसी खुशी… उत्साह…आनंद… समाधान.. सुख ..चैतन्य…प्रेम..मांगल्याची पखरण करीत ऋतुराज वसंत दिमाखाने चराचरात वावरत असतो. मांगल्याची,प्रसन्नतेची..माणुसकीची गुढी उभारून ही वसंताचे स्वागत केले जाते.
या ऋतुराजाची मोहिनी सर्वांना च पडते. मग लावण्यखणी ..नवयौवना धरा ..नववधुसम.. लज्जीत … ऋतुराजाच्या प्रेमात न पडली तरच नवल! ती या ऋतुराजाची आतुरतेने प्रतीक्षा करीतच असते.
क्षितीजी लाल रंगाची उधळण…मधूनच पर्जन्याची पखरण.. अवकाशी अवचित चपलेची चमचम…मेघगर्जनेची वाजंत्री..इंद्रधनु च्या सप्तरंगी मांडवात….निर्झराची नुपुरे रूणझुणवीत…मोहक पदन्यासाने पृथा.. या ऋतुंच्या अनभिषिक्त राजाला वरते. आनंद…चैतन्याची बरसात होते..नी हा सुंदर.. मनभावन…लग्नसोहळा…संपन्नतो.
या ऋतुराजाच्या साम्राज्यात
आनंद चैतन्याचा असा
झरा वाहतो निरंतर
नवसृजनाचा नवकलीकांचा
गंध स्वार वा-यावर.
सौ मंजिरी अनसिंगकर नागपूर.
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————