सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहातील नव्यानं बसविण्यात आलेला फ्रीजर पुन्हा बंद अवस्थेत होता. नव्यानं बसविलेला फ्रीजर कुलिंग देत नसल्यानं तो निरूपयोगी ठरत होता. यामुळे आपत्कालात मृतदेह ठेवायचा कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला होता. नव्यानं खरेदी केलेल्या या फ्रीजरच्या व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी करताच २४ तासांच्या आत हा फ्रीजर पुर्ववत झाला आहे.
मुंबईवरून तंत्रज्ञ सावंतवाडी दाखल होत यातील तांत्रिक अडचण दुर करण्यात आली आहे. दरम्यान, शुल्लक कारणामुळे, वैद्यकीय अधिक्षक व उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याच समोर आलं आहे. शवगृहातील या फ्रीजर मेंटेनन्ससाठी प्रशासनानं अनुभवी तंत्रज्ञाची नियुक्ती करावी, जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये व मृतदेहांना यातना सहन कराव्या लागू नयेत असं मत देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केले.