कणकवली
खासदार संजय राऊत यांच्यासारखी माणसे चोर बाजारात स्वस्तात विकत भेटतात. यापुढे संजय राऊत यांनी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याबद्दल बेताल वक्तव्य केले, अपशब्द बोलला तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे कपडे मी टराटरा फाडेन. त्यांचे सर्व अंडी पिल्ले बाहेर काढेल. त्यामुळे यापुढे स्वतःच्या मालकाची इज्जत किती ठेवावी हे संजय राऊत यांनी ओळखूनच वक्तव्य करावे. त्यांच्या अंगावर किती कपडे ठेवावेत हे त्यांनीच ठरवावे. सकाळचा भोंगा सुरू करण्यापूर्वी उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांचा फोटो पहावा आणि मगच बोलावे कारण भ्रष्टाचाराचा आरोप उद्धव ठाकरेंवर सुद्धा झालेला आहे. खुनाचा आरोप आदित्य ठाकरेंवर सुद्धा झालेला आहे. नंदकिशोर चतुर्वेदी, पाटणकर हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आहेत. ठाकरे कुटुंब आणि जुहू येथील जसरा कुटुंब यांचे काय संबंध आहेत हे आम्हाला माहित आहे. दिशा सालियान, जया जाधव यांच्या खुनाचा संबंध कोणापर्यंत येऊन पोहोचतोय हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे खासदार राऊत यांनी तेही ऐकण्याची हिंमत ठेवावी आणि यापुढे वक्तव्य करावे असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला.
आम्ही राणे आहोत.! स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक आहोत.केंद्रीय मंत्री,माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले आहे.ते त्यांचे कट्टर शिवसैनिक होते.आम्हला बाळासाहेबांची शिकवण आहे. आम्हाला कोणाची भीती वाटत नाही. उलट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे यांची काय स्थिती झाली होती हे रामदास कदम यांच्या तोंडातून ऐका. त्यावेळी ते घाबरून रामदास कदम यांचे संरक्षण घेऊन फिरत होते. हे विसरू नका त्यामुळे यापुढे कोणतीही पातळी सोडली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किंवा माझ्या भाजपच्या कोणत्याही नेत्यावर तुम्ही टीका केली. अपशब्द बोलला तर पळता भुई थोडी करू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.