कणकवली
भारत सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ३० दिवस कालावधीचे कुक्कुटपालन मोफत प्रशिक्षण वर्ग कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग मार्फत आयोजित करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय ओरोस येथे हे २१० तास (३० दिवस) प्रशिक्षण दिले जाणार आहे.
‘कुक्कुटपालन म्हणजे एक रोजगाराची संधी ‘कुक्कुट घर बांधणी व जागेची निवड,कोंबडी पालनाच्या पध्दती,एक दिवसीय पिल्लांची घ्यावयाची काळजी,कुक्कुटपालन व्यवस्थापन, कोंबडयांचे खाद्य व्यवस्थापन,कोंबडयांतील रोग, लसीकरण वेळापत्रक व औषधोपचार,कोंबडयांचे विक्री व्यवस्थापन,कोंबडयांचे ब्रुडींग,कोंबडी घराची स्वच्छता व जैवसुरक्षतेविषयी घ्यावयाची काळजी, कोंबडयांच्या विविध जाती व उत्पादकता याबाबत माहिती दिली जाणार आहे.
या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्याने किमान ५वी पास, वय किमान १८ वर्ष असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणाच्या प्रवेश व अधिक माहितीसाठी त्वरीत संपर्क साधा
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग संपर्क कार्यालय :- ९४२२४४९०१८ डॉ. केशव देसाई, पशुवैद्यकिय तज्ञ व मुख्य प्रशिक्षक, कृषि विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग संपर्क : ९४२२३७३०५६ संगणक सहाय्यक-९४०४३९६९३७
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.