You are currently viewing वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे वसुंधरा आठवडा या उपक्रमाअंतर्गत भव्‍य सायकल रॅली तून नागरिकांमध्ये जनजागृती

वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे वसुंधरा आठवडा या उपक्रमाअंतर्गत भव्‍य सायकल रॅली तून नागरिकांमध्ये जनजागृती

वेंगुर्ले

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत वसुंधरा आठवडा या उपक्रमाअंतर्गत आज २६ एप्रिल रोजी सकाळी भव्‍य सायकल रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. या रॅलीतून पेट्रोल, डिझेल व गॅसवर चालणारी वाहने न वापरता सायकलचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले.महाराष्‍ट्र शासनामार्फत जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल २०२३ रोजी साजरा करण्‍यात येतो. त्‍याअनुषंगाने २२ एप्रिल २०२३ ते २८ एप्रिल २०२३ हा आठवडा वसुंधरा आठवडा (Earth Week) म्‍हणून साजरा करण्‍यात येत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्‍या प्रदुषणामुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावर दुष्‍परिणाम होत आहेत. पेट्रोल, डिझेल व गॅसवर चालणा-या वाहनांच्‍या प्रदुषणामुळे वातावरणातील ऑक्‍सीजनचे प्रमाण कमी होवून निसर्गाचा समतोल ढासळत चाललेला आहे. यावर उपाय म्‍हणून पेट्रोल, डिझेल व गॅसवर चालणारी वाहने न वापरता सायकलचा वापर करणेसाठी प्रोत्‍साहन मिळावे म्‍हणून नगरपरिषदेने भव्‍य सायकल रॅलीचे आयोजन केलेले होते. ही सायकल रॅली वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयापासून सुरु होवून हॉस्‍पीटल नाका- अग्निशमन केंद्र – स्‍टेडीयम – पॉवर हाऊस – रामेश्‍वर मंदिर- पिराचा दर्गा- गणपती मंदिर – दाभोली नाका ते पुन्हा नगरपरिषद कार्यालय पर्यंत काढण्‍यात आली.

या रॅलीमध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ, माजी नगराध्‍यक्ष श्री दिलीप गिरप, वेंगा बॉयजचे डॉ. राजेश्‍वर उबाळे आणि त्यांचे सहकारी, सर्व अधिकारी कर्मचारी आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले.
माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत वसुंधरेचे जतन करण्‍यासाठी, पंचमहाभुतांचे प्रदुषण कमी करण्‍याासाठी विविध संदेश देणारे माहिती फलक लावून सदर सायकल रॅली काढण्‍यात आली. या सायकल रॅलीच्‍या निमित्‍ताने पर्यावरणाचे संतुलन राखणेसाठी जास्‍तीत जास्‍त नागरीकांनी सायकलचा वापर करावा असे आवाहन मुख्‍याधिकारी कंकाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा