देवगड
देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाचे वतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शेठ म ग हायस्कूलचे शिक्षक प्रवीण खडपकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान हे ग्रंथ प्रदर्शन 29 एप्रिल पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे त्यामुळे सर्व वाचकांनी या ग्रंथालयास भेट द्यावी व लाभ घ्यावा असे ग्रंथालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी खडककर म्हणाले 23 एप्रिल हा विख्यात साहित्य विल्यम शेक्सपियरचा स्मृतिदिन म्हणून जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. या दिना निमित्त जगातील सर्व नामांकित लेखकांना आदरांजली वाहण्यात येते. पुस्तके ही जगण्याची अनुभूती देतात. पुस्तकामुळे अनेक विचारवंतांना प्रेरणादेखील मिळाली आहे. लेखकांने लिहिलेल्या पुस्तकाचे विविध भाषांमधील अनुवाद होत असतात त्यामुळे साहित्याच्या कक्ष रुंदावतात आणि लेखन कला विकसित होते. समाज वाचनाभिमुख करण्यासाठी ग्रंथालयांनी जास्तीत जास्त वाचक चळवळ वृद्धीगत करावी असेही खडपकर म्हणाले.
यावेळी ग्रंथालयाचे संचालक, सदस्य सिताराम पाटील, ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर कर्णिक सचिव संजय धुरी, संचालक दत्तात्रय जोशी आधी उपस्थित होते.