You are currently viewing कासार्डे शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्था कार्याध्यक्षपदी संजय पाताडे यांची निवड
_upscale

कासार्डे शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्था कार्याध्यक्षपदी संजय पाताडे यांची निवड

तळेरे : प्रतिनिधी

कासार्डे विकास मंडळ मुंबई. संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सिनियर कॉलेज कासार्डे कार्यरत आहे.
कासार्डे विकास मंडळ मुंबई या संस्थेच्या स्थानिक व्यवस्था समिती कार्यकारीणीमध्ये
फेरबदल करण्यात आले असून, कासार्डे विकास मंडळ मुंबईच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष म्हणून कासार्डे येथील विविध संघटनेचा अनुभव असलेले तसेच अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले,मुक्त पत्रकार आणि पुणे विद्यापीठाचे पदवीधर तथा विद्यालयचे माजी विद्यार्थी असलेले श्री.संजय संभाजी पाताडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नव्याने कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले संजय संभाजी पाताडे यांचे १२वी पर्यंतचे शिक्षण कासार्डे प्रशालेतून पूर्ण झाले.
त्यानंतर नोकरी व्यवसाया निमित्त पुणे येथे वास्तव्य. पत्रकारिता पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ, जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत सन 2000 चा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार दिल्ली येथील ग्लोबल इकॉनोमिक कौन्सिलतर्फे बॅंगलोर येथे देण्यात आला होता.
१९९८ पासून ते पूर्ण वेळ कासार्डे येथे वास्तव्यास आहेत. शेती, सिलिका सॅंड व्यवसायीक व मुक्त पत्रकार म्हणून ते कार्यरत आहेत. अनेक सामाजिक संस्थांमधून त्यांचे सामाजिक कार्य सुरू असते. या सर्व बाबींची दखल घेत, कासार्डे विकास मंडळ मुंबईच्या कार्यकारीणीने, कासार्डे हायस्कूल व कॉलेजची स्थानिक व्यवस्था सांभाळण्यासाठी कार्याध्यक्ष म्हणून संजय पाताडे यांची नियुक्ती केली आहे.
,*स्थानिक व्यवस्था समितीची नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -*
कार्याध्यक्ष -:संजय संभाजी पाताडे
कार्यवाहक – रवींद्र गणपत पाताडे.
कार्यवाहक – मुख्याध्यापक. मधुकर धोंडू खाड्ये यांची निवड करण्यात आली असून तर सदस्य म्हणून
रवींद्र सिताराम पाताडे,
सहदेव भिकाजी म्हस्के,
दीपक गंगाराम गायकवाड,
लक्ष्मण पुंडलिक सरवणकर,
प्रभाकर दत्तात्रय नकाशे,
लक्ष्मण राजाराम पाताडे,
आनंद लक्ष्मण कासार्डेकर,
किशोर राजाराम कुडतरकर यांची निवड झाली आहे तर
ज्येष्ठ सल्लागार म्हणून-प्रभाकर लक्ष्मण कुडतरकर यांची निवड करण्यात आली आहे.
स्थानिक व्यवस्था समितीच्या नुतन कार्यकारिणीचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर , सरचिटणीस रोहिदास नकाशे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘कासार्डे विकास मंडळाच्या जुन्या जाणत्या माणसांचा अनुभव व सर्वांना सोबतच घेऊन प्रशालेच्या भौतिक सुधारणा व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नुतन कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी निवडीनंतर मनोदय व्यक्त केला.
या नुतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा