You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी यांचा भाजपाकडून सत्कार

वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी यांचा भाजपाकडून सत्कार

वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी यांचा भाजपाकडून सत्कार

वेंगुर्ला

वेंगुर्ला नगरपरिषदेला शहर सौंदर्यीकरण व स्‍वच्‍छता स्‍पर्धा २०२२ मध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यात प्रथम क्रमांक मिळविल्‍याबद्दल भारतीय जनता पार्टी वेंगुर्लाच्‍या वतीने वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी श्री परितोष कंकाळ यांचा सत्‍कार मा. माजी आमदार तथा जिल्‍हा‍ध्‍यक्ष भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग श्री राजनजी तेली यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. तसेच माजी नगराध्‍यक्ष श्री राजनजी गिरप यांचा सुध्‍दा सन्‍मान करण्‍यात आला.
याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेने मागील सात वर्षात केलेल्‍या सर्वोत्‍तम कामगिरीमुळे राज्‍य स्‍तरीवरील हा सर्वोत्‍तम पुरस्‍कार मिळाल्‍याचे सांगितले. वेंगुर्ला नगरपरिषदेवर मागील पाच वर्षात भारतीय जनता पार्टीचा लोकनियुक्‍त नगराध्‍यक्ष व नगरसेवक यांची सत्‍ता होती. भारतीय जनता पार्टीच्‍या हातात सत्‍ता दिल्‍यावर अशा प्रकारची प्रगती होवू शकते यांचे सर्वोत्‍तम उदाहरण म्‍हणजे वेंगुर्ला नगरपरिषद आहे. असे मा. राजन तेली यांनी या प्रसंगी सांगितले. वेंगुर्ला नगरपरिषदेत आतापर्यंत झालेली सर्व विकास कामे मा. पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्‍हाण साहेब यांच्‍या मार्गदर्शनाखाली झाली आहेत. यापुढे सुध्‍दा नगरपरिषदेला विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले.
यावेळी मा. मुख्‍याधिकारी श्री परितोष कंकाळ यांनी हा पुरस्‍कार मी सर्व वेंगुर्ला वासीयांच्‍या वतीने स्विकारला असल्‍याचे सांगितले. या यशामध्‍ये स्‍वच्‍छता प्रेमी नागरीक लोकप्रतिनधी, अधिकारी व स्‍वच्‍छता कर्मचारी यांचा सिहांचा वाटा आहे. या पुरस्‍कारासोबतच जबाबदारी सुध्‍दा वाढल्‍याचे सांगितले. यावेळी मा. नगराध्‍यक्ष राजनजी गिरप, मा. जिल्‍हा स‍रचिटणीस प्रसन्‍ना देसाई, मा. मंडळ अध्‍यक्ष सुहास गवंडळकर, उपनगराध्‍यक्षा कु. शितल आंगचेकर , नगरसेवक श्री प्रशांत आपटे , नगरसेवक धर्मराज कांबळी , नगरसेवीका कृपा गिरप , नगरसेवीका साक्षी पेडणेकर , नगरसेवीका श्रेया मयेकर , शहराध्‍यक्ष श्री सुरेंद्र चव्‍हाण , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके व सुषमा खानोलकर , जि.का.का.सदस्य बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , तुुळस माजी सरपंच विजय रेडकर , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , रवींद्र शिरसाठ , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर , रसिका मठकर , आकांक्षा परब , वृंदा मोर्डेकर , दिंव्यांग आघाडीचे सुनील घाग , सुनील मठकर , राकेश सापळे आदी मान्‍यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा