You are currently viewing दांडी समुद्रकिनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल रोजी गाबीत महोत्सव

दांडी समुद्रकिनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल रोजी गाबीत महोत्सव

महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाबीत समाजाच्या ध्वजाचे अनावरण

 

मालवण :

 

मालवण दांडी समुद्रकिनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या गाबीत महोत्सव पार्श्वभूमीवर गाबीत समाज झेंड्याचे अनावरण रविवारी करण्यात आले. समुद्राचा निळा रंग असलेला हा झेंडा समुद्र किनारपट्टीवर वसलेल्या गाबीत समाज जीवनाचे प्रतीक असून गाबीत महोत्सवात नौका व समाज बांधवांच्या हातात हा झेंडा फडकणार आहे.

गाबीत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दांडी येथील झालझुल मैदानावर मालवण तालुका गाबीत क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी गाबीत महोत्सव टीशर्टचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर वायरी येथे माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या निवासस्थानी महोत्सव नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत गाबीत समाज झेंड्याचे अनावरण करण्यात आले.

यावेळी गाबीत समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, अशोक तोडणकर, हरी खोबरेकर, स्थानिक समिती अध्यक्ष अन्वय प्रभू, मेघनाद धुरी, देवगड अध्यक्ष संजय पराडकर, लक्ष्मण तारी, दिलीप घारे, बाबी जोगी, नरेश हुले, रुपेश प्रभू, रुपेश खोबरेकर, विकी चोपडेकर, धर्माजी आडकर, संजय केळूसकर, पांडुरंग कोचरेकर, भूषण मेतर, हेमंत मोंडकर, गंगाराम आडकर, रमेश तारी, पूजा सरकारे, सुरवी लोणे, माधुरी प्रभू, स्वाती कुबल, दिक्षा ढोके, निनाक्षी मेतर आदी व इतर समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा