You are currently viewing रेशन कार्ड ऑनलाइन करताना रेशन कार्ड धारकांना होणाऱ्या अडचणींबाबत….

रेशन कार्ड ऑनलाइन करताना रेशन कार्ड धारकांना होणाऱ्या अडचणींबाबत….

कणकवली तहसीलदारांना प्राांतिक सदस्य निलेश गोवेकर यांचे राष्ट्रवादी उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या उपस्थितीत निवेदन सादर

कणकवली

रेशन कार्ड ऑनलाइन करतेवेळी काही रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द झाले आहे त्यामुळे त्यांना धान्य उपलब्ध होत नाही आणि तसेच महत्त्वाचे अंत्योदय रेशन कार्डधारकसुद्धा धान्यापासून वंचित राहत आहेत. तरी रेशन कार्ड ऑनलाईन करतेवेळी रेशन कार्डमध्ये झालेल्या चुकीमुळे एका रेशन कार्डमध्ये दुसऱ्याच व्यक्तीचे नाव नोंदवले जात आहे. तरी या ऑनलाइनच्या प्रक्रियेमुळे लोकांना नाहक त्रास होत आहे. तरी कृपया सदर रेशन कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने त्यांना त्वरीत धान्य मिळावे अशी तहसीलदार कणकवली यांना निवेदनाद्वारे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांनी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, यांच्या उपस्थितीत मागणी केली आहे.

यावेळी रुपेश जाधव, समीर आचरेकर, सागर वारंग, चंद्रकांत नाईक, संदेश मयेकर, प्रकाश सावंत, देवेंद्र पिळणकर इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा