You are currently viewing मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी एक्सप्रेसला झाराप थांबा मिळावा

मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी एक्सप्रेसला झाराप थांबा मिळावा

सिंधुदुर्ग

मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी एक्सप्रेसना झाराप रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा अशी मागणी वेंगुर्ले आडेली येथील गजानन चं. मुंडये यांनी केली आहे. सदर स्टेशन वर थांबा मिळावा ही मागणी पूर्वी पासून आहे. परंतु या कडे का दुर्लक्ष होत आहे? या स्थानकवर केवळ “दिवा” गाडिच थांबते. वेंगुर्ले, वेतोरे, माणगाव, साळगाव, आडेली, आकेरी, मठ, इत्यादी सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या गावातील नागरीकांना कुडाळ अथवा सावंतवाडी या रेल्वे स्टेशनवर उतरुन आपल्या गावापर्यंत अधिक भाडे आकारुन जावे लागते. जे सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. विनंती अर्ज करूनही रेल्वे प्रशासन या अडचणीकड़े दुर्लक्ष करत आहे. वरील तीन मेल एक्सप्रेस “झाराप” या रेल्वे स्टेशनवर थांबवुन आमचे प्रवाशी जीवन आर्थिक सुसह्य करावे अशी मागणी गजानन चं. मुंडये यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा