You are currently viewing तांबेळडेग येथे १६ हे रोजी राज्यस्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

तांबेळडेग येथे १६ हे रोजी राज्यस्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

मुंबई – प्रमोद कांदळगावकर

देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग गावांची ओळख उत्सवप्रिय गाव अशी राहिली आहे.
श्री देव महापुरुष मंदिर उभारणी केल्यानंतर प्रतिवर्षी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दि. १६ मे २०२३ रोजी संपन्न होणार असून पूजेचे यजमान म्हणून संगणकतज्ज्ञ सचिन महादेव केळुसकर सौ. रसिका सचिन केळुसकर या दांपत्याला बहुमान देण्यात आला आहे.
यानिमित्ताने जागर कलावंतचा या सदरात राज्यस्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२३ मोठा गट व लहान गट अशा स्वरूपात घेण्यात येणार आहेत. मोठा गट प्रथम पारितोषिक रु ६ ०००/- दुसरे पारितोषिक ४०००/- तिसरे ३०००/- लहान गट प्रथम पारितोषिक ३०००/- दुसरे २०००/- तिसरे १०००/- तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावनोंदणी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत सनये, निलेश प्रभू, नितिन कोळंबकर यांच्या खालील नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर ९४०५९२८१७४ , ९४०५२१६७४९ , ८२७५९४१८४० नावनोंदणी दि. १४ मे २०२३ पूर्वी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा